राणी लक्ष्मीबाई पुलाचा ८९ वा वर्धापन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:06+5:302021-06-23T04:08:06+5:30
-- भोर : भोर एसटी स्टॅंडजवळील नीरा नदीवर असलेल्या संस्थानकालीन पुलाला २० जून रोजी ८९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त ...
--
भोर : भोर एसटी स्टॅंडजवळील नीरा नदीवर असलेल्या संस्थानकालीन पुलाला २० जून रोजी ८९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त या पुलाची स्वच्छता करून पुलाचे पूजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
भोर शहराचे प्रवेशव्दार असलेला राणीलक्ष्मीबाई पूल सन १९३३ बांधण्यात आला. त्यानिमित्ताने सहायक फौजदार शिवाजी काटे व पोलीस हवलदार सुभाष गिरे व शिलेदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश महांगरे व संदीप कासुर्डे यांनी पुलाच्या वर्धापन दिनानिमित्त औचित्य साधून पूजन केले. उपअभियंता संजय वाघज व शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी पुलाच्या स्वच्छतेच्या निवेदनाची दखल घेऊन स्वच्छता केल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानले. पुलावरील स्वच्छतेची मागणी शिलेदार प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती त्याची दखल घेत बांधकाम विभागानेही पुलावरील स्वच्छता आणि पुलाचे आयुष्यमान वाढावे यासाठी पुलाच्या पिलरवरील झाडीझुडपे काढून टाकली.
--
चौकट
ऐतिहासिक 'राणी लक्ष्मीबाई ब्रिज'
भोर शहरामध्ये प्रवेश करताना नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई हा पूल भोर संस्थानचे अधिपती राजे रघुनाथराव पंतसचिव यांनी या पुलाचे काम २० फेब्रुवारी १९३१ रोजी सुरू केले व ते १७ मे १९३३ रोजी पूर्ण झाले त्या काळी या पुलाच्या कामाला सुमारे १ लाख ४० हजार रुपये खर्च आला होता. पुण्याचे व्ही. आर. रानडे ॲण्ड सन्सने हा पूल उभारला होता. त्यावेळी मुंबई इलाख्याचे गव्हर्नर मेजर जनरल सर फेडरिक हे होते. त्यांचे प्रतिनिधी लेफ्टनंट कर्नल बिलबर क्रेस पेल यांनी २० जून १९३३ रोजी पूल वाहतुकीस खुला केला होता.
--फोटो
--फोटो क्रमांक २२ भोर राणी लक्ष्मीबाई पूल
फोोटो ओळी : राणी लक्षीबाई पुलाच्या वर्धापन दिनानिमित्त पुलाचे पूजन करताना सहायक फौजदार शिवाजी काटे व पोलीस हवलदार सुभाष गिरे.