मेरगळवाडीला अहल्यादेवी होळकर जयंती साजरी

By Admin | Published: June 15, 2014 04:19 AM2014-06-15T04:19:25+5:302014-06-15T04:19:25+5:30

मेरगळवाडी (ता. दौंड) येथे अहल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील म्हणाले, की पूर्वी जातीभेद मानला जात नव्हता

Celebrating Ahilyadevi Holkar Jayanti in Megalwadi | मेरगळवाडीला अहल्यादेवी होळकर जयंती साजरी

मेरगळवाडीला अहल्यादेवी होळकर जयंती साजरी

googlenewsNext

दौंड : मेरगळवाडी (ता. दौंड) येथे अहल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील म्हणाले, की पूर्वी जातीभेद मानला जात नव्हता; मात्र सध्याच्या परिस्थितीत जातीभेद मोठ्या प्रमाणावर फोफावत चालला असून, ही गंभीर बाब आहे. धनगर आणि मराठा या दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही अपप्रवृत्तीचे लोक तरुण पिढीत विष पेरीत आहेत, ही बाब घातक असल्याचे शेवटी जगदाळे म्हणाले.
या वेळी डॉ. हेडगेवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्ताजी शेणोलीकर म्हणाले, की अहल्यादेवींनी जात, धर्म डोळ्यांसमोर ठेवून काम केले नाही. त्यांनी सर्वधर्मीय लोकांसाठी लढा दिला आहे. तेव्हा त्यांचे कार्य सध्याच्या पिढीला माहीत असणे आवश्यक आहे. प्रास्ताविक पी. जे. मेरगळ यांनी केले.
या वेळी भीमा पाटस कारखान्याचे संचालक महेश भागवत, अशोक सुळ, बाळासाहेब तोंडेपाटील, मोहन पडवळकर, शिवाजी पवार, सुहास जगदाळे, महेश मारकड, लक्ष्मण पवार, सुमित चोरमले, नागेश बेलूरकर, अप्पासाहेब येडे, तुकाराम सावळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. शरद गावडे, राजेंद्र मेरगळ, सचिन मेरगळ, दादा मेरगळ, शरद पवार, तुकाराम मेरगळ, रावा पडळकर, भिवाजी मेरगळ, बाळासाहेब गावडे, संजीव गावडे, नीलेश येडे,
हनुमंत मेरगळ, शिवाजी मेरगळ, गोरख मेरगळ, नितीन मेरगळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. (वार्ताहर)

Web Title: Celebrating Ahilyadevi Holkar Jayanti in Megalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.