Deccan Queen | पुण्यात 'डेक्कन क्वीन'चा 93 वा वाढदिवस उत्साहात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 12:22 PM2022-06-01T12:22:42+5:302022-06-01T12:40:27+5:30
डेक्कन क्वीनचा वाढदिवस केक कापून साजरा
पुणे : पुणे आणि मुंबईदरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनचा आज 93 वा वाढदिवस आहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे सुरू होऊऩ आज तब्बल 93 वर्षे पूर्ण झाली. त्याच्याच मुहूर्तावर पुण्यात डेक्कन क्वीनचा वाढदिवस प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुंबई मार्गावरील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय डेक्कन क्वीन या रेल्वे गेल्या 93 वर्षांपासून सेवा देत आहे. यामुळेच आज पुणे स्टेशनवर या गाडीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुणेकर प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन आज 93 वर्षांची झाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. 1 जून 1930 रोजी ही गाडी पहिल्यांदा धावली होती.
पुणे - मुंबई प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत आवडीची आणि सोईची आहे. या गाडीसोबत प्रवाशांच अनोखं नातं गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याच कारणाने 'डेक्कन क्विन' एक्सप्रेसचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
93 व्या वाढदिवसानिमित्ताने गाडी छान सजवण्यात आली होती. डेक्कन क्वीनचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
डेक्कन क्वीन अर्थात दक्खनची राणीही प्रसिद्ध आणि प्रवाशांच्या प्रथम पसंतीची रेल्वेगाडी आहे. डेक्कन क्वीनला आज ९२ वर्षे पूर्ण करून आज ९३ व्या वर्षात पदार्पण केले. या गाडीत काळानुसार बद्दल करण्यात आले, डब्यांची संख्या वाढविण्यात आली. देशातील पहिली डायनिंग कार सुविधा असलेली ही एकमेव रेल्वे गाडी आहे.
- अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे