संविधानदिन उत्साहात साजरा : प्रास्ताविकेचे वाचन; पालखीतून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 03:54 AM2017-11-27T03:54:06+5:302017-11-27T03:54:09+5:30
शहरातील शैक्षणिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांच्या वतीने संविधान दिन रविवारी विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
पिंपरी : शहरातील शैक्षणिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांच्या वतीने संविधान दिन रविवारी विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधानाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ज्ञानप्रभात विद्यामंदिर
रुपीनगर येथील ज्ञानप्रभात विद्यामंदिरात संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल गवळी, संचालक बाळासाहेब सावंत, सुमन गवळी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे, माध्यमिकचे मुख्याध्यापक राहुल गवळी उपस्थित होते. विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. संविधानाचे पूजन अध्यक्ष गवळी यांच्या हस्ते झाल्यानंतर पालखीतून दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधानविषयक घोषणा दिल्या. वंदना घेण्यात आली. संविधानावर आधारित गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
विश्वरत्न इंग्लिश स्कूल
म्हेत्रेवाडी, चिखली येथील राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या विश्वरत्न इंग्लिश मीडिअम स्कूल आणि विष्णुपंत ताम्हाणे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष व्यंकट वाघमोडे यांनी ध्वजवंदन केले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपाध्यक्ष मोहन देवकते, सत्यवान वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या रंजना आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. किरण अडागळे यांनी मार्गदर्शन केले. साधना चव्हाण यांनी आभार मानले.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले) वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटण्यात आले. संविधान प्रतींचे वाटप आणि वाचन करण्यात आले. शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, बाळासाहेब भागवत, भाऊसाहेब अडागळे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष ख्वाजा शेख, युवक अध्यक्ष प्रणव ओव्हाळ, दत्ता ठाणांबीर, विकास गरड, अशोक गायकवाड, भरत खरात, सुनील वाघमारे, विष्णू गजधने, सुनील वाघमारे, राजू बनसोडे, बापू गायकवाड, कुणाल व्हावळकर, राजू उबाळे आदी उपस्थित होते.
कॉँग्रेस पर्यावरण विभाग
शहर काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने नेहरू नगर येथील आंबेडकर नगरात संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. खाऊवाटप करण्यात आले. आयोजन शहराध्यक्ष उमेश बनसोडे यांनी केले. संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाही आपण स्वीकारली आहे, ती राबवण्याची जबाबदारी प्रत्येक सुज्ञ नागरिकांची आहे आणि ती राबविण्याची शपथ दिली गेली.काँग्रेस पर्यावरण विभाग प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, कॉँग्रेसच्या अ.भा. सदस्या निगार बारस्कर, अशोक मंगल, राजेश नायर, अर्जुन गायकवाड, साहिब निंबर्गीकर, सन्मुख आयगोळे, कल्याणी साखरे, परशुराम आयगोळे, उपस्थित होते. २६/११च्या दहशतवादी हल्लयातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रिपाइं वाहतूक आघाडी
रिपाइं (आठवले) वाहतूक आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अजीज शेख, शहराध्यक्ष सलीम शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान अत्तार आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. जयभीम माथाडी संघटनेचे शहराध्यक्ष आनंद देवकर, बबलू शेख, अश्फाक तांबोळी, राजू वंजारी, प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, अब्दुल रहमान उपस्थित होते.
न्यू सिटी प्राईड स्कूल
रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि मुख्याध्यापिका मंजुळा मुदलियार, बी. एस. कांबळे, सुहास जुनवणे उपस्थित होते. शिक्षिका रेणू राठी, हेमा शेलार यांनी मार्गदर्शन केले. अरुण चाबुकस्वार यांनी संविधान दिनाबाबत माहिती सांगितली. बी. एस. कांबळे यांनी संविधानाचे महत्व सांगितले. विद्याथ्यार्नी व शिक्षिकानी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन केले व प्रतिज्ञा घेण्यात आली. सूत्रसंचालन शिक्षिका शिल्पा गायकवाड यांनी केले तर सुवर्णा पाटील यांनी आभार मानले.
पी. के. स्कूलमध्ये सांस्कृ तिक कार्यक्रम
रहाटणी : पिंपळे सौदागर येथील वैहभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल स्कुलमध्ये संविधान दिना निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते संविधान पूजन करण्यात आले. २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, साने अनिता, संगीता पराळे उपस्थित होते.
काटे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटना समितीने सादर केलेला अंतिम मसुदा म्हणजे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. शाळेत या निमित्त संविधान दिनाची शपथ घेण्यात आली. संविधानातील नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले सूत्र संचालन सारिका पत्की व रुपाली जाधव यांनी केले.
संविधान प्रतिमेला पुष्पमाला
देहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात बसविण्यात आलेल्या उद्देशिकेच्या प्रतिमेला संविधान दिनानिमित्त बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप व उपाध्यक्ष यांनी पुष्पमालिका अर्पण केली. बोर्डाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास पुण्यातील दक्षिण विभागाचे रक्षासंपदा प्रधान संचालक एल. के. पेंगू यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्वांनी संविधान समजून घेण्याची खरी गरज आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सानप, बोर्ड सदस्य रघुवीर शेलार यांनीही मनोगत व्यक्त केले. कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत, शिवसेनेचे रमेश जाधव, आरटीआय कार्यकर्ते पोपट कुरणे, सितारा मुलाणी, सिकंदर मुलाणी उपस्थित होते. सीईओ सानप यांनी संविधान निर्मितीपासूनची सविस्तर माहिती देत संविधानाचे महत्त्व विशद केले. प्रास्ताविकेचे वाचन केले. किरण गोंटे यांनी सूत्रसंचालन केले. शेलार यांनी आभार मानले.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथील पुतळ्यासमोर प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष खंडेलवाल, सीईओ सानप , पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. कॅन्टोन्मेंट सदस्य मारिमुत्तू, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, राष्ट्रवादीचे नेते रफिक आत्तार, रफिक शेख, पोपट कुरणे, रमेश जाधव, विजय मोरे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खंडेलवाल, सानप, मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. तंतरपाळे यांनी सूत्रसंचालन केले.
देहूरोड पोलीस ठाणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या चिंचोली, देहूरोड, शेलारवाडी, किन्हई, मामुर्डी, तसेच झेंडेमळा आदी शाळांत संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
देहूरोड : संविधान दिनानिमित्त येथील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) पक्ष कार्यालय येथून ढोलच्या निनादात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमी येथे जाऊन भीमस्मरण करण्यात आले. या वेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रपालसिंग रत्तू, जिल्हा सदस्य दिलीप कडलक, शहराध्यक्ष अमित छाजेड, उपाध्यक्ष अशोक चव्हाण, राहुल अलकोंडे, गणेश बनसोडे, सागर निकम, राज धनवडे, तोपिक शय्यद, खाजा शेख, विजय वाघेला, बंडू गायकवाड आदी उपस्थित होते.