मराठ्यांच्या २५० व्या दिल्ली विजयानिमित्त पुण्यात आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:12 AM2021-02-13T04:12:06+5:302021-02-13T04:12:06+5:30

निमित्त होते, इतिहासप्रेमी मंडळातर्फे शिवाजीनगर परिसरातील एसएसपीएमएसच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आयोजित आनंदोत्सव कार्यक्रमाचे. या वेळी सरसेनापती हंबीरराव ...

Celebration in Pune on the occasion of 250th victory of Marathas in Delhi | मराठ्यांच्या २५० व्या दिल्ली विजयानिमित्त पुण्यात आनंदोत्सव

मराठ्यांच्या २५० व्या दिल्ली विजयानिमित्त पुण्यात आनंदोत्सव

Next

निमित्त होते, इतिहासप्रेमी मंडळातर्फे शिवाजीनगर परिसरातील एसएसपीएमएसच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आयोजित आनंदोत्सव कार्यक्रमाचे. या वेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वारसदार विक्रमसिंह मोहिते, सरदार विसाजीकृष्ण बिनीवाले यांचे वारसदार सुहास बिनीवाले, अनघा बिनीवाले, शशिकांत बिनीवाले, स्वामिनी मालिकेत माधवराव पेशवे यांची भूमिका साकारणारा युवा कलाकार चिन्मय पटवर्धन, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते.

मराठ्यांच्या दिल्ली विजयाला २५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शिवप्रतिमेचे पूजन करुन व दिवाळी साजरी करुन या आनंदोत्सव करण्यात आला. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान माधवराव पेशवे आणि सरदार महादजी शिंदे यांचा पोशाख परिधान केलेल्या भूषण पाठक आणि सिद्धार्थ दाभाडे या युवकांनी या वेळी शिवरायांचे स्मरण केले.

मोहन शेटे म्हणाले, पानिपतच्या मैदानावर सन १७६१ मध्ये मराठ्यांनी अतुलनीय पराक्रम केला. परंतु त्या वेळी त्यांचा दारुण पराभव झाला. मात्र, त्यानंतर अवघ्या १० वर्षांत सन १७७१ मध्ये मराठा साम्राज्याचे पंतप्रधान माधवराव पेशवे आणि सरदार महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीवर भगवा झेंडा फडकवला. त्या घटनेला या वर्षी २५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यामध्ये पेढे वाटून देखील आनंदोत्सव करण्यात आला.

Web Title: Celebration in Pune on the occasion of 250th victory of Marathas in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.