कोरेगाव भीमात रक्तदानाने शंभूछत्रपतींची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:37+5:302021-05-18T04:10:37+5:30
कोरेगावातील हनुमान मंदिरात, पुण्यातील सह्याद्री ब्लड बँकेच्या सहकायार्ने झालेल्या या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांना दिपाली कोठारी व स्नेहल चोरडिया यांनी ...
कोरेगावातील हनुमान मंदिरात, पुण्यातील सह्याद्री ब्लड बँकेच्या सहकायार्ने झालेल्या या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांना दिपाली कोठारी व स्नेहल चोरडिया यांनी वर्षभरासाठी मोफत अपघात विमा तर ब्लड बँकेमार्फत आयुष्यभर गरजेच्या प्रसंगी मोफत रक्त सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली. या निमित्ताने प्लाझ्मा दात्यांची यादीही करण्यात आली. या रक्तदान शिबिराला शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे , यांनी प्रथमत: रक्तदान केले, त्यांचे अनुकरण करत शिक्रापूर पोलीस चौकीतील इतर कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले, तर गावातील सर्व वयोगटातील ग्रामस्थांनी रक्तदान करण्यास भरघोस प्रतिसाद देत आपले सामाजिक उत्तरदायित्व जपले.
या शिबिराला आमदार अशोक पवार, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, खरेदी-विक्री संघाचे राजेंद्र नरवडे, सरपंच अमोल गव्हाणे, घोडगंगेचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, माजी सदस्य अशोक गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, संदीप ढेरंगे, अशोक काशीद, उपसरपंच शिल्पा फडतरे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, कांतीलाल फडतरे, प्रकाश ढेरंगे, योगेश गव्हाणे, अनिकेत गव्हाणे, विक्रम गव्हाणे, शैला फडतरे आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन शंभूभक्त कोरेगाव भीमा यांच्यावतीने अभिषेक सव्वाशे, किरण गव्हाणे, शुभम फडतरे, महेश फडतरे, अमित कदम, रविंद्र गव्हाणे , सागर गव्हाणे व अनेक तरुणांनी पुढाकार घेतला.
कोरेगावातील तरुणांचा आदर्श समाजात आदर्शवत
समाजास आज खरी गरज असलेल्या व प्रशासनाने दिलेले नियम पाळीत रक्तदान व प्लाझ्मादान शिबीर कोरेगाव भीमा येथील तरुणांनी घेत समाजात आदर्श निर्माण केला असुन या उपक्रमाचे अनुकरण करुन इतर गावांनीही शिबीर राबवायला हवे असे आमदार अॅड अशोक पवार यांनी सांगितले.
--------------------------
कोरेगाव भीमा येथे रक्तदान शिबिरात आमदार अशोक पवार यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व झाड देवून गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर