कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या नावाची पाटी, जागतिक महिलादिन विविध ठिकाणी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:02 AM2018-03-11T06:02:01+5:302018-03-11T06:02:01+5:30
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत आदर्श ग्रामपंचायत भूगावतर्फे गावातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी अभिनेत्री गिरीजा ओक यांच्यासह गावातील महिलांनी सहभाग घेत शोभायात्रा काढून ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा दिला.
भूगाव - जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत आदर्श ग्रामपंचायत भूगावतर्फे गावातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी अभिनेत्री गिरीजा ओक यांच्यासह गावातील महिलांनी सहभाग घेत शोभायात्रा काढून ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा दिला.
गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशिन बसविण्यात आली आहे. गावातील सुमारे ३५०० घरांत कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या नावाची पाटी बसविली जाणार आहे. ब्रिटन्स कारपेट कंपनीच्या वतीने राजमाता जिजाऊ सभागृह बांधण्यात येणार आहे, याचे भूमिपूजन करण्यात आले. गावात मुलीचा जन्म झालेल्या अशा १५ मातांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. परित्यक्त्यातील लाभधारक महिलांना प्रमाणपत्र वाटप करून गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानही या वेळी करण्यात
आला. या वेळी संत बहिणाबाई महिला प्रसारक दिंडीच्या संस्थापिका मंगला कांबळे, सिनेअभिनेत्री गिरीजा ओक, अश्विनी जाधव, शुभांगी करवीर, कोमल साखरे, सविता दगडे, छाया मारणे, कोमल वाशिवले, अंजली कांबळे, सारिका मांडेकर, सविता पवळे, राधिका कोंढरे, संगीता पवळे, स्वाती ढमाले, दगडू करंजावणे, सरपंच मधुकर गावडे, माजी सरपंच विजय सातपुते, बाळासाहेब शेडगे, सचिन मिरघे, उपसरपंच जयश्री कुंभार, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र इंगवले, माजी उपसरपंच हर्षा चोंधे, मनीषा शेडगे, सुजाता सांगळे, प्रमिला चोंधे, सुरेखा चोंधे, सुरेखा कांबळे, मंगल फाळके, विभावरी गुरव, बेबी मोरे, पोलीसपाटील नितीन चोंधे उपस्थित होते. स्त्रिया प्रजनन करू शकतात, ही सर्वात मोठी ताकद आहे. त्यात लाज वाटून घेण्याची गरज नाही. ही स्त्रियांची शक्ती आहे. सॅनिटरी पॅड वापरण्याबरोबरच त्याचे डिस्पोजलही खूप महत्त्वाचे आहे. त्यावर लाल रंग लावल्यास ओळखू येईल, असे अभिनेत्री गिरीजा ओक यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात, याचाच एक भाग म्हणून तसेच स्त्रियांना एक व्यासपीठ या कार्यक्रमातून मिळाले. आज एकविसाव्या शतकामध्ये स्त्री सुरक्षित नाही. त्यातच वंशाला दिवा पाहिजे, या हव्यासापोटी मुलींना गर्भातच मारले जात आहे. मुलीचा जन्म नको, मग सावित्रीबार्इंचा वसा कोण चालू ठेवणार? स्त्री-भ्रूणहत्या रोखणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- मधुकर गावडे (सरपंच, आदर्श ग्रामपंचायत भूगाव)
कष्टकरी महिलांचा सन्मान
पुणे : दुष्काळामुळे गावांतील रोजगार संपला म्हणून मुला-बाळांसह कष्टकरी महिला शहरात रोजगार मिळविण्यासाठी येतात. बिगारी काम, बांधकाम क्षेत्रात मिळेल तिथे मजुरी व रस्त्यावर खोदाईची कामे या महिला पोटाची खळगी भरण्यासाठी करतात. या कष्टकरी महिलांचा सन्मान धनकवडीतील श्रीराम योग ग्रुपच्या वतीने करण्यात आला.
निमित्त होते जागतिक महिलादिनी आयोजित कार्यक्रमाचे. श्रीराम योग ग्रुपने या वेळी योग ग्रुपचे अध्यक्ष भानुदास पायगुडे, शोभा जाधव, नलिनी दळवी, शकुंतला कोंडे, मीनाक्षी पायगुडे, छाया मांडोत, शुभाराणी हिंगमिरे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.
पथारी व्यावसायिक महिलांचा गौरव
सिंहगड रस्ता : जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव बुद्रुक येथील विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नाट्यरंगकर्मी कुमार आहेर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा वेश परिधान करून स्वारगेट परिसरातील महिला पथारी व्यावसायिकांना गुलाबपुष्प व विष्णू गरूडलिखित ‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’ संहिता देऊन सन्मानित केले. या वेळी विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संस्थापक विष्णू गरुड, अध्यक्ष गणेश राऊत, रोहित मेन्द्रे, स्वप्निल शेंडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पथारी व्यावसायिक महिलांचा सन्मान विश्वकर्मा प्रतिष्ठान करीत आहे, हे निश्चितच फुल्यांचे कार्याचे गमक आहे.