सरकारच्या अध्यादेशाने धायरीत आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:12 AM2021-03-06T04:12:00+5:302021-03-06T04:12:00+5:30
धायरी येथे हवेली तालुका कृती समितीच्या वतीने राज्य सरकारचे अभिनंदन करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना कृती ...
धायरी येथे हवेली तालुका कृती समितीच्या वतीने राज्य सरकारचे अभिनंदन करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील म्हणाले, गुंठेवारी कायद्यांतर्गत विनापरवाना बांधलेली घरे कायद्यांमुळे नियमित होणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये राज्य सरकारने गुंठेवारी कायदा केला होता. त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामाच्या नोंदी रखडल्या आहेत.
बहुतांश घरांच्या बेकायदेशीर बांधकाम अशी नोंद ग्रामपंचायतीत करण्यात आली आहे. याबाबत कृती समितीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती.
यावेळी अध्यक्ष चव्हाण -पाटील,अँड. नितीन दसवडकर, राजू मते व संतोष पोकळे यांनी सर्व सामान्य नागरिक, भूमिपुत्रांच्या व्यथा मांडल्या. राज्यात पुन्हा गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याचे साकडे घालण्यात आले होते. गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याची प्रक्रिया बंद असल्याने धायरी, खडकवासला, शिवणे, उत्तमनगर आदींसह शहराच्या सभोवतालच्या उपनगरातील एक दोन गुंठ्यांत बांधकामे करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांत संभ्रमाचे वातावरण होते.
सरकारच्या सरकारच्या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.
फोटो ओळ : कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याबाबत निवेदन दिले.