पुरंदरच्या विद्याथिर्नींचा रशियात मराठमोळा गणेशोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:34 PM2018-09-19T15:34:41+5:302018-09-19T15:35:01+5:30

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो.

celebreted Ganesh festival of Purandar's students in Russia | पुरंदरच्या विद्याथिर्नींचा रशियात मराठमोळा गणेशोत्सव 

पुरंदरच्या विद्याथिर्नींचा रशियात मराठमोळा गणेशोत्सव 

googlenewsNext
ठळक मुद्देयापुढे आम्ही सगळे येथे एकत्र येऊन शक्य तेवढे सण साजरा करण्याचा प्रयत्न करणार

पुरंदर : भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु शिक्षण,व्यापार,नोकरी आदी कारणाने अनेक भारतीय परदेशात जातात. पुरंदर तालुक्यातील विद्यार्थिनीं रशियात उच्चशिक्षणासाठी गेल्या असताना त्यांनी भारतीय परंपरेनुसार त्याठिकाणी गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करत गणेशोत्सव साजरा करतात. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु, या प्रत्येकाची मराठमोळ्या संस्कृती, सणांशी जोडली गेलेली नाळ सोबत जपण्याचा प्रयत्न केला जातो. 
आज अनेक भारतीय कुटुंबे परदेशात राहत आहेत.तेथे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरगुती स्वरूपात गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पद्धतीने पूजा करून परंपरेनुसार त्याचे विसर्जन केले.
पुरंदर तालुक्यातील काजल चौंडकर (नायगाव), काजल भिंताडे(भिवडी),ऋतुजा कुंभारकर(वनपुरी),सायल जगताप(जेजुरी),आर्या पाटील (धनकवडी) ह्या मुली उच्च वैद्यकीय शिक्षण रशिया येथे घेत आहेत. परदेशात शिकत विद्यार्थिनींना असलेल्या या गणेश चतुर्थीला सुट्टी मिळत नसल्यामुळे या उत्सवासाठी भारतात परत येता आले नाही. मात्र, गणपती विषयी असणारी ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती.यामुळेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या विद्यार्थिनींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या तेथील राहत्या घरी गणेश मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करत आपण कोठेही असोत मनात भक्तिभाव असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे या विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे. आम्हाला देशाची व येथील सण उत्सवांची खूपदा आठवण येत असते. त्यामुळे यापुढे आम्ही सगळे येथे एकत्र येऊन शक्य तेवढे सण साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव लाभावे हीच आमची इच्छा आहे.भारताची संस्कृती परदेशात देखील जपण्याचे प्रयत्न करत असल्याचे काजल चौंडकर हिने सांगितले .                       

Web Title: celebreted Ganesh festival of Purandar's students in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.