सेन्सॉर बोर्ड हा बागलबुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:37 AM2019-01-14T00:37:22+5:302019-01-14T00:37:40+5:30

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : प्रवीण तरडे यांची टीका

Censor Board is bagulbua | सेन्सॉर बोर्ड हा बागलबुवा

सेन्सॉर बोर्ड हा बागलबुवा

googlenewsNext

पुणे : विषयाबद्दल माहिती नाही आणि बोंबलत सुटायचे हे आजच्या माध्यमांचे काम आहे. स्वत:ची मतं लादणारा माणूस सिस्टीममध्ये आणि माध्यमात असायलाच नको. मीडिया चित्रपटाला मोठे करणार नसेल, तर आम्ही चित्रपटनिर्मितीचे धाडस कसे करायचे? अर्धा महाराष्ट्र शिव्या देतो, मग आमच्या चित्रपटात शिव्या असल्या तर काय झाले? ‘सेन्सॉर बोर्ड’ हा बागुलबुवा आहे. मराठी चित्रपट झोपावा म्हणून तो भो-भो करतो, असे टीकास्र चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सेन्सॉर बोर्डावर सोडले.


पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पिफ फोरममध्ये ‘२०१८ सालातील मराठी चित्रपटांचे यश’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाऊराव कºहाडे, दिग्पाल लांजेकर, संदीप जाधव, राजेंद्र शिंदे, सौमित्र पोटे, मेघराज राजेभोसले आणि विनोद सातव उपस्थित होते.


सेन्सॉर बोर्ड ही एक सिस्टीम आहे. सिस्टीममध्ये स्वत:चे मत कसे असू शकते? सेन्सॉर बोर्डावरील पदाधिकाऱ्यांची आपल्याला मिळणारी उत्तरे, त्यांचे नियम विचित्र आहे. हे पदाधिकारी स्वत:चे मत लादतात, अशा शब्दांत तरडे यांनी सेन्सॉर बोर्डालाच लक्ष्य केले. निर्मात्यांनी लेखनात ढवळाढवळ करायची नाही. लेखन चार माणसांशी चर्चा करून होत नाही. लेखन हे अधिष्ठान आहे, असेही ते म्हणाले.


..सरस्वतीची साथ
मराठी चित्रपटाला २०१८ वर्षाचा मोठा आशीर्वाद लाभला आहे. प्रेक्षकांची साथ मराठी चित्रपटाला मिळाली. लक्ष्मीचा नाही तर सरस्वतीचासुद्धा येथे सहवास लाभतो हे मराठी मनाचे वैशिष्ट्य आहे. २०१८ या वर्षी बॉलिवूड तोट्यात असून मराठीने चित्रपटाची अर्थव्यवस्था तारली. चित्रपट बनविणे हा एक भाग आणि मार्केटिंग करणे हा चित्रपटाचा दुसरा भाग असतो. चित्रपट हा कुटुंबातल्या प्रत्येकाला आनंद देणारा असावा. चित्रपट हा कलेचा व्यवसाय आहे. काही गोष्टी कलेलाही आपण देणे लागतो. हे एक प्रकारच विज्ञान आहे.
- मंगेश कुलकर्णी

प्रेक्षक कसा येईल...
चित्रपटाला फक्त पैसा लावणे, हे चित्रपट निर्मात्याचे काम नाही. तर, चित्रपटाच्या कथानकाचे सामर्थ्य काय, या कथानकामुळे प्रेक्षक प्रेक्षागृहामध्ये येईल का? हे बघावे लागते. कथानकातील सामग्रीच्या भरवशावर चित्रपट निर्मात्याला चित्रपटावर पैसा लावावा लागतो. चित्रपटातील अभिनेत्यांची निवड करण्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत निर्माता तिथे असायला हवा.
- संदीप जाधव

Web Title: Censor Board is bagulbua

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.