‘सेन्सॉर बोर्ड ’हे केवळ पैसे खाण्यासाठीच -कुमार शाहनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:34 AM2018-12-25T01:34:31+5:302018-12-25T01:34:53+5:30

‘भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक प्रतिभावंत दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून कुमार शाहनी ओळ्खले जातात. हिंदीमध्ये समांतर चित्रपटाचा त्यांनी पाया रचला.

'Censor Board' is meant only to eat money- Kumar Shahani | ‘सेन्सॉर बोर्ड ’हे केवळ पैसे खाण्यासाठीच -कुमार शाहनी

‘सेन्सॉर बोर्ड ’हे केवळ पैसे खाण्यासाठीच -कुमार शाहनी

Next

- नम्रता फडणीस

पुणे : ‘भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक प्रतिभावंत दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून कुमार शाहनी ओळ्खले जातात. हिंदीमध्ये समांतर चित्रपटाचा त्यांनी पाया रचला. ‘माया दर्पण’, ‘ख्यालगाथा’, ‘तरंग’, कस्बा’ हे त्यांचे कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण चित्रपट मानले जातात. ‘माया दर्पण’ने राष्ट्रीय चित्रपटाच्या पुरस्काराचा मानही पटकावला आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता कुमार शाहनी यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.

तुमचं सेन्सॉर बोर्डाबद्दल मत काय?
ल्ल सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा असताना शर्मिला टागोर यांनी हे बोर्ड बंद करा, असे सुचविले होते. सेन्सॉर बोर्ड हे केवळ पैसे खाण्यासाठीच आहे. कित्येकांना रोजगार मिळाला आहे. केवळ लहान मुलांच्या संरक्षणासाठी सेन्सॉरशिप असावी, पोनोग्राफी वगैरे गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत. प्रौढांना गरज नाही. जितकी बंधन घातली जातील तेवढ्या त्या गोष्टी सगळीकडे पसरतील. सेन्सॉरशिप यशस्वी होऊ शकत नाही.
एफटीआयआयमध्ये विद्यार्थी दशेत असताना ॠत्विक घटक आणि डी. डी. कोसंबी यांच्याकडून काय शिकायला मिळाले?
ल्ल गुरूंकडून जीवन कसं जगायचं यापासून ते व्यवसायाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून कसं पाहायचं, या सगळ्याचं ज्ञान प्राप्त होतं. प्रत्येक गोष्टीकडे कोणत्या नजरेतून पाहतो, याचे विचारमंथन करण्याची दिशा दिली. कोसंबी यांच्यासमवेत रोमँटिक चित्रपट पाहाताना एका प्रसंगात पांढरे पान दाखविण्यात आले होते. तो किस्सा आजही आठवतो. ते पान कशामुळे पांढरे झाले, तर ग्रीन फिल्टरच्या सिनेमॅटोग्राफीतील प्रभावामुळे तसे दिसत आहे हे त्यांनी सांगितले. छोट्या छोट्या गोष्टींमधून सौदर्याशास्त्राकडे पाहाण्याची दृष्टी कोसंबी यांनी दिली.
देशात अराजकतेचे वातावरण आहे असे वाटते का? हुकूमशाही प्रवृत्ती, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला, यागोष्टी तुम्हाला अस्वस्थ करतात का?
ल्ल हो, थोडफार तसचं वातावरण आहे. वृत्तपत्रात वाचले की व्यक्तिगत आयुष्यावर देखील सरकारचे लक्ष्य राहाणार आहे. त्यासाठी एजन्सींना काम देण्यात आले आहे. असे झाले तर देशात ‘पोलीस स्टेट’ तयार होतील. व्यक्तिगत आयुष्य राहूच नये असं वाटणं ही खूप गंभीर गोष्ट आहे. क्लासिकल समाजच उरणार नाही. जर कोणत्याच प्रकारचे व्यक्तिगत आयुष्य नसेल तर संविधानात नमूद केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अर्थच काय उरतो?
तुमच्या चित्रपटांमध्ये संगीत, नृत्य सारख्या कलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे? त्यामागे कोणती दृष्टी होती?
ल्ल संगीत आणि नृत्यात कायिक वाचिक सर्वकाही आहे. प्रत्येक अर्थ त्यामधून प्रतित होतो. माणूस श्रृती ऐकून त्याचा पाया निर्माण करतो. त्यातून वातावरणनिर्मिती होते.
चित्रपटांची ‘क्लास’ आणि ‘मास’ अशी वर्गवारी केली जाते? त्याबददल तुम्ही सहमत आहात का?
ल्ल केवळ आर्थिक गणित त्यामागचे कारण आहे. आमच्याकाळी हे द्वंद्व होतेच. एखादी गोष्ट व्यक्ती समजू शकत नाही असे मला वाटत नाही. तो त्या विषयाकडे किती संवेदनशील दृष्टीकोनातून पाहातो हा मुददा माझ्यासाठी अधिक महत्वपूर्ण आहे.चित्रपट हे उत्पादन नाही तर ते एक माध्यम आहे. मला ही वर्गवारी मान्य नाही.

Web Title: 'Censor Board' is meant only to eat money- Kumar Shahani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे