केंद्राच्या योजना कॅन्टोन्मेंटलाही

By admin | Published: June 26, 2017 03:49 AM2017-06-26T03:49:52+5:302017-06-26T03:49:52+5:30

केंद्र सरकारच्या सर्व योजना राज्य सरकारच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटला लागू करणार, त्यामुळे कॅन्टोन्मेंटचा कायापालट होईल,

Center planning cantonment also | केंद्राच्या योजना कॅन्टोन्मेंटलाही

केंद्राच्या योजना कॅन्टोन्मेंटलाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खडकी : केंद्र सरकारच्या सर्व योजना राज्य सरकारच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटला लागू करणार, त्यामुळे कॅन्टोन्मेंटचा कायापालट होईल, तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा, उपचारपद्धती स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे केली जातील, असे आश्वासन रक्षा संपदा विभागाचे महानिदेशक जोजनेश्वर शर्मा यांनी दिले.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील प्रसूती वॉर्डचे नूतनीकरणाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
शर्मा पुढे म्हणाले, ‘‘महिला व बाल आरोग्याची विशेष काळजी घेऊन झोपडपट्ट्यांमध्ये मोबाइल टॉयलेट, सीवेज ट्रीटमेंट प्लॅण्ट, शुद्ध पाणी, लाइट आदी सुविधा कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना पुरवणार. बोर्डाकडे सध्या जो फंड आहे तो खर्च करा. त्यानंतर पुढील फंड केंद्राकडून उपलब्ध होईल.’’
या प्रसंगी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर धीरज मोहन, शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, संचालक भास्कर रेड्डी, पुणे व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिंसिपल डायरेक्टर गीता कश्यप, बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत, नगरसेवक सुरेश कांबळे, आरोग्य समिती अध्यक्ष नगरसेवक कमलेश चासकर, दुर्योधन भापकर उपस्थित होते.

Web Title: Center planning cantonment also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.