राष्ट्रीय सुरक्षेत केंद्र सरकारची तडजोड: काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:35+5:302021-01-25T04:10:35+5:30

पुणे: रिपब्लिक टी.व्ही. चे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थोदास गुप्ता यांच्यातील व्हॉट्‌सॲप चॅटमधील अनेक गंभीर बाबी उघड ...

Central government's compromise on national security: Congress alleges | राष्ट्रीय सुरक्षेत केंद्र सरकारची तडजोड: काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय सुरक्षेत केंद्र सरकारची तडजोड: काँग्रेसचा आरोप

Next

पुणे: रिपब्लिक टी.व्ही. चे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थोदास गुप्ता यांच्यातील व्हॉट्‌सॲप चॅटमधील अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत, तरीही केंद्र सरकार त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही, यावरून सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करत आहे, असा आरोप करत काँग्रेसच्या शहर शाखेने शनिवारी बालगंधर्व चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

अर्णव गोस्वामी व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी या वेळी केली. जोशी म्हणाले,‘‘पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची पूर्व माहिती अर्णव गोस्वामीला होती, असे व्हाटसॲपवरील संवादावरून स्पष्ट होते. जवानांच्या मृत्यूचे राजकारण करून निवडणूक जिंकायची असे मोदी सरकारने ठरविले होते का? असा प्रश्न निर्माण यावरून निर्माण होतो.

या गंभीर विषयबाबत पंतप्रधान मोदींनी देशाच्या जनतेला माहिती द्यावी, असे आवाहन काँग्रेसने केले.

नगरसेवक अविनाश बागवे, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, महिला अध्यक्ष सोनाली मारणे यांची भाषणे झाली. कमल व्यवहारे, अजित दरेकर, लता राजगुरू, नीता रजपूत, शेखर कपोते, सुनिल शिंदे, सुधीर काळे, राजेंद्र शिरसाट, शिवाजी बांगर, शाबीर खान, ऋषीकेश बालगुडे, सूमित डांगी व पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Central government's compromise on national security: Congress alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.