केंद्र सरकारचे लसीकरणाचे धोरण फसले - चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:18+5:302021-07-19T04:09:18+5:30
पुणे : कोरोना आपत्तीत कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस हाच एकमेव उपाय सध्या आहे़ मात्र जानेवारीपासून आजपर्यंत केवळ देशातील ८ टक्के ...
पुणे : कोरोना आपत्तीत कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस हाच एकमेव उपाय सध्या आहे़ मात्र जानेवारीपासून आजपर्यंत केवळ देशातील ८ टक्के नागरिकांचेच लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहे़ त्यामुळे सध्याच्या दुपटीने लसीकरण झाले तरी या वर्षाअखेरीस जास्तीत जास्त २५ कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल़ त्यामुळे चार लसीकरण करून, वर्ल्ड रेकॉर्ड झाले असे सांगणाऱ्या केंद्र सरकारचे लसीकरणाचे धोरण पूर्णपणे फसले आहे़ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला़
पेट्रोल-डिझेलचा दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने स्वत:चे कर कमी करावेत, असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, फडणवीस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलवर जो व्हॅटचा दर होता, तोच दर आजही आहे. राज्याने त्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे फडणवीस हे खोटे बोलत असून, केंद्राने कर कमी केले तर राज्यही कर कमी करू शकेल, असेही ते म्हणाले़
----------------------------