मध्य रेल्वेची मे महिन्यात ६.३२ दशलक्ष टन मालवाहतुकीचे लोडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:54+5:302021-06-03T04:09:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मे महिन्यात संपूर्ण मध्य रेल्वेत ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक झाली आहे. मागील वर्षीच्या ...

Central Railway loads 6.32 million tonnes in May | मध्य रेल्वेची मे महिन्यात ६.३२ दशलक्ष टन मालवाहतुकीचे लोडिंग

मध्य रेल्वेची मे महिन्यात ६.३२ दशलक्ष टन मालवाहतुकीचे लोडिंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मे महिन्यात संपूर्ण मध्य रेल्वेत ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक झाली आहे. मागील वर्षीच्या मे महिन्यात ४.३२ टन इतकी मालवाहतूक झाली होती. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा तब्बल ४५.९ टक्के जास्त मालवाहतूक झाली. यात पुणे विभागाने सर्वांत कमी म्हणजे ०.२९ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. सर्वांत जास्त मालवाहतूक नागपूर विभागाने केली असून नागपूर विभागाने मे महिन्यात ७.३० दशलक्ष टन इतकी विक्रमी वाहतूक केली आहे.

मे २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ६.३२ दशलक्ष टन वाहतूक केली जी मे २०२० मधील ४.३३ दशलक्ष टनच्या तुलनेत ४५.९ टक्के जास्त आहे. यात ३.५७ दशलक्ष टन कोळसा, ०.२१ दशलक्ष टन लोखंड व स्टील, ०.५८ दशलक्ष टन सिमेंट, ०.८६ दशलक्ष टन कंटेनर आणि १.१० दशलक्ष टन खत, पीओएल इत्यादींचा समावेश असलेले इतर मालवाहतूक लोडिंग केली आहे.

मध्य रेल्वेने एप्रिल व मे मिळून १२.५७ दशलक्ष टन माल वाहतूक केली. यात मुंबई विभाग २.८३ दशलक्ष टन, भुसावळ विभाग ०.९५ दशलक्ष टन, नागपूर विभाग ७.३० दशलक्ष टन, पुणे विभाग ०.२९ दशलक्ष टन आणि सोलापूर विभाग १.२० दशलक्ष टन इतके लोडिंग झाले आहे.

रेल्वे प्रशासन मालवाहतुकीकडे ग्राहकांना अधिक आकर्षक करण्यासाठी अनेक सवलतीही देत आहे. वर्षभरात मालवाहतुकीचा वेग जवळजवळ दुप्पट झालेला आहे.

Web Title: Central Railway loads 6.32 million tonnes in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.