...म्हणून अधिवेशन नाही, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 01:08 PM2021-05-28T13:08:22+5:302021-05-28T16:26:59+5:30
महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नाही
पुणे: केंद्रात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहून अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असं चंद्रकांत पाटील म्हणतात. केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे. अशी वक्तव्य पाटील हे नेहमीच करत असतात. सर्वजण झोपेत असताना सरकार पडेल अशी भविष्यवाणीही त्यांनी केली होती. यावर स्वप्न पडण्याचा छंद असेल असे प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिले आहे. पुण्यात साखर कारखान्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीत ते विविध विषयांवर बोलत होते.
लॉकडाऊन वाढवण्याबाबत दोन दिवस परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही यावेळी सांगितले. राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येतानाचे चित्र दिसून येत आहे. पॉझिटिव्हीटी रेटही खाली गेले आहेत. पण हा रेट पूर्णपणे कमी होत नाही. तोपर्यंत संकट अजून टळले असे म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.
काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही. तर काही ठिकाणी मृत्यदरातही घट होताना दिसत नाहीये. त्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्याची रणनीती ही वेगळीच असणार आहे. कोरोना संदर्भात ऑक्सिजन, औषधे, बेड या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यांची कमतरता भासणार नाही याकडे सरकार अधिक लक्ष देणार आहे. पाहून लॉकडाऊनचा विचार केला जाईल. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे.
सोलापूरकरांवर अन्याय होणार नाही
उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूरकरांचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यांचे वाटेचे पाणी कुठंही जाऊ दिले जाणार नाही.