विठ्ठलवाडीतील उपक्रमांचे केंद्रीय पथकाकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:24+5:302021-09-18T04:11:24+5:30

शिरूर तालुक्यातील हगणदरीमुक्त प्लस स्वयंघोषित करण्यात आलेले श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी गावची घनकचरा महाश्रमदान स्वच्छतादिनाचे औचित्य साधत स्वच्छ भारत मिशनच्या केंद्रीय ...

Central team appreciates the activities in Vitthalwadi | विठ्ठलवाडीतील उपक्रमांचे केंद्रीय पथकाकडून कौतुक

विठ्ठलवाडीतील उपक्रमांचे केंद्रीय पथकाकडून कौतुक

Next

शिरूर तालुक्यातील हगणदरीमुक्त प्लस स्वयंघोषित करण्यात आलेले श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी गावची घनकचरा महाश्रमदान स्वच्छतादिनाचे औचित्य साधत स्वच्छ भारत मिशनच्या केंद्रीय पथकाने पाहणी केली. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे केंद्रीय सल्लागार जुमेद उस्मानी, सुचिता देव, पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, राज्य सल्लागार चंद्रकांत कचरे, कार्यक्रम व्यवस्थापक विकास कुडवे, जिल्हा तज्ज्ञ विक्रम शिंदे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीने राबवलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प सार्वजनिक स्वच्छतागृह वैयक्तिक स्वच्छतागृह स्मशानभूमी परिसर, अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री पांडुरंग विद्या मंदिर यांची पाहणी करून कौतुक केले.

यावेळी सरपंच शंकर धुळे,उपसरपंच महेंद्र गवारे, सोसायटीचे अध्यक्ष काळूअण्णा गवारे, विस्तार अधिकारी डी.के.गायकवाड, ग्रामसेवक डी.एन.कुंभार, माजी उपसरपंच सोपान गवारे, बाळासाहेब गवारे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता गवारे, ज्योती गवारे, प्रतिभा वाळके, सविता चोरामले,सागर ढमढेरे,सुनील गवारे,बाळासाहेब गवारे,पोलीस पाटील शरद लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते,युवराज गवारे,अमोल गवारे,सुधीर कातोरे उपस्थित होते.

जिल्हा परिषदच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोनपे म्हणाले की, पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींची चौदाशे गावे असून, घनकचऱ्याचा प्रकल्प राबवण्यासाठी चौदाशे गावांकडे १५६ कोटी रुपये पंधराव्या वित्त आयोगाचे असून, स्वच्छ मिशन भारत अंतर्गत जिल्हा परिषदेकडे २८ कोटी रुपये निधी उपलब्ध आहे. ग्रामपंचायतींनी घनकचरा प्रकल्प अंतर्गत स्वच्छतेसाठी १५ व्या वित्त आयोगाचा गावचा पैसा गावातच वापरायचा आहे.

१७ तळेगाव ढमढेरे

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करताना केंद्रीय पथकातील अधिकारी.

170921\img_20210916_122543.jpg

?????????? ???? ???????? ?????????? ????????? ?????????? ????? ?????? ???????? ???

Web Title: Central team appreciates the activities in Vitthalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.