अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:29+5:302020-12-24T04:11:29+5:30
यामध्ये पथकाचे अध्यक्ष आर पी सिंग यांच्यासह केंद्रीय कमिटी पथकातील सदस्य तुषार व्यास, एम. एस. सहारे ...
यामध्ये पथकाचे अध्यक्ष आर पी सिंग यांच्यासह केंद्रीय कमिटी पथकातील सदस्य तुषार व्यास, एम. एस. सहारे यांचा समावेश होता.
केंद्रीय पथकाने इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या जमिनींच्या नुकसानीचे पाहणी दौरा केला. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांसमवेत प्रश्न विचारून चर्चा करून संवाद साधला. शेतीचे कर्ज घेतलेल्या, जमिनी पावसामध्ये वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पथकाने प्रश्न विचारले . मात्र यामध्ये दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रांत अधिकारी आणि तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना माहिती दिल्यानंतर लाभ मिळू शकतो, असे केंद्रीय पथकाने सांगितले. मात्र त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे क्षेत्र आहे, त्यांना लाभ घेता येणार नाही, असा केंद्राचा ‘जीआर’ असल्याचे पथकाने तेथील स्थानिक नागरिकांना सांगितले.
पथकाने उपस्थित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यास सांगितले. त्याचबरोबर अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी पथकासमोर विविध प्रश्न मांडले.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय कृषि अधिकारी बारामती बालाजी ताटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख तालुका कृषी अधिकारी भाऊ साहेब रूपनवर, मंडलकृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे कृषी सहाय्यक सुनील झगडे व भादलवाडीचे सरपंच, नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
——————————————————
...त्यांना भरपाई देण्याबाबत विचाराधीन
भादलवाडी येथे अतिवृष्टी झाल्यानंतर पुलावरून वाहिलेल्या पाण्याचे खरी पाहणी करण्यासाठी ते पथक आले होते. अतिवृष्टी मुळे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी दोन फुटापेक्षा अधिक वाहून गेल्या ,त्यांना भरपाई देण्याबाबत विचाराधीन आहे ,असेही आश्वासन पथकाने शेतकºयांना दिले असे कृषी अधिकारी बाळासाहेब रुपनवर यांनी माहिती दिली.
———————————
भादलवाडी येथे अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
२३१२२०२०-बारामती-१४
——————————————