लस न देताच लसीकरण झाल्याचे सर्टिफिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:01+5:302021-05-12T04:13:01+5:30
कोथरूड परिसरातील ज्येष्ठ नागरिक असलेल्या आरती वैद्य यांनी सांगितले, की त्यांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोस घेतला होता. त्यांचा दुसरा डोस ...
कोथरूड परिसरातील ज्येष्ठ नागरिक असलेल्या आरती वैद्य यांनी सांगितले, की त्यांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोस घेतला होता. त्यांचा दुसरा डोस १६ एप्रिल रोजी होता. लसीकरण केंद्रावरही त्यांना याच काळात येऊन दुसरा डोस घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख आल्याने त्या वाट पहात होत्या. परंतु, त्यांच्यासह सोसायटीमधील अन्य रहिवाशांना दुसरा डोस मिळाल्याचे मेसेज आले. हा मेसेज आल्याने सर्वांना धक्का बसला. त्यानंतर, नागरिकांनी वेबसाईटवर जाऊन प्रमाणपत्र तपासले. तर, दुसरा डोस यशस्वीरीत्या झाला याबाबतचे प्रमाणपत्रही साईटवरून डाऊनलोड झाले.
-----
सिस्टीमचा दोष की लसींची पळवापळवी
एकीकडे शहरात नागरिकांना लस मिळत नाहीये. दुसरीकडे लसीकरण केंद्रांवर नगरसेवकांनी ताबे मारल्याची टीका होऊ लागली आहे. नगरसेवकांच्या संपर्कातील व्यक्तींना लवकर लस मिळते असाही आरोप होत आहे. त्यामुळे या नागरिकांचा दुसरा डोस झाल्याचा आलेला मेसेज हा सिस्टीमचा दोष आहे की त्यांच्या नावावर भलत्यानेच लस घेऊन लसींची पळवापळवी केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.