मार्केट यार्डातील सेसची वसुली बाजार समितीमार्फत थेट करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:37+5:302021-09-23T04:13:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सेसची वसुली बाजार समिती मार्फत थेट खरेदीदारांकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सेसची वसुली बाजार समिती मार्फत थेट खरेदीदारांकडून गेटवर करावी, अशी मागणी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने केली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री व खासदार शरद पवार यांना या संदर्भात पत्र पाठवले आहे.
गेल्या काही वर्षांत नियमन मुक्ती झाल्यापासून बाजार आवारातील व्यापारावर फार मोठा परिणाम झालेला आहे. मात्र, बाजार आवारात सर्व नियम लादून तेच बाजार समितीच्या आवाराबाहेर थेट खरेदी-विक्रीला कोणतेही नियम लागू नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम बाजार आवारातील व्यापारावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे आडते असोसिएशन सचिव रोहन उरसळ यांनी सांगितले.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या स्पर्धेत टिकाव्यात याकरिता सर्वप्रथम बाजार आवारातसुद्धा नियमन मुक्ती झाली पाहिजे. तसेच भारतातील प्रमुख बाजारपेठ मानली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सेस खरेदी थेट खरेदीदारांकडून गेटवरच वसुल करावी. त्यामुळे बाजार आवारातील व्यापार वाढण्यास मदत होईल, असे आडते असोसिएशनने भूमिका मांडली आहे.