संतापजनक कृत्य करणाऱ्याला बेड्या; उकळत्या पाण्यात बुडवून चिमुकल्याचा बळी घेणारा नराधम जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 05:09 PM2023-04-25T17:09:51+5:302023-04-25T17:10:41+5:30

चिमुकलीला मारताना मानलेली बहीण अडवण्यास अडवण्यास आली असता तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा आरोपीने प्रयत्न केला

Chains to the offender; Murderer jailed for drowning toddler in boiling water | संतापजनक कृत्य करणाऱ्याला बेड्या; उकळत्या पाण्यात बुडवून चिमुकल्याचा बळी घेणारा नराधम जेरबंद

संतापजनक कृत्य करणाऱ्याला बेड्या; उकळत्या पाण्यात बुडवून चिमुकल्याचा बळी घेणारा नराधम जेरबंद

googlenewsNext

शेलपिंपळगाव : सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात बुडवून ठार मारणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनने बेड्या ठोकल्या. गुन्हा केल्यानंतर आरोपी प्रथम मुंबई आणि तिथून इतर ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बहुळ (ता. खेड) परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. विक्रम शरद कोळेकर (वय २३, रा. कोयाळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रम याने एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला. त्याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याला एक मुलगा देखील आहे. फिर्यादी महिला ऑर्केस्ट्रामध्ये काम करते. त्यातूनच आरोपीची फिर्यादी महिलेसोबत ओळख झाली. महिलेला सव्वा वर्षाचा मुलगा आहे. ती आणि तिची मानलेली बहीण एकत्र राहत होत्या.

मागील काही दिवसांपासून आरोपी देखील फिर्यादी महिलेच्या घरी राहत होता. दरम्यान त्याने फिर्यादी महिलेकडे लग्नाची मागणी घातली. मात्र आरोपीसोबत लग्न करण्यास फिर्यादीने नकार दिला. त्या कारणावरून आरोपीने ६ एप्रिल रोजी फिर्यादी यांच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात आणि पाय एकत्र धरून बाथरूम मधील उकळत्या पाण्यात बुडवले. त्यामध्ये मुलाची पाठ, डोके, चेहरा, पोट, पाय गंभीरपणे भाजली गेली. भाजलेल्या ठिकाणची कातडी जळून गेल्याने उपचारादरम्यान मुलाचा १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. हा सर्व प्रकार आरोपीने फिर्यादी यांच्या मानलेल्या बहिणीसमोर केला. मानलेली बहीण त्यास हा प्रकार करताना विरोध करत असताना तिचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा आरोपीने प्रयत्न केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी युनिट तीनने दोन पथके तयार केली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे खेड तालुक्यातील बहुळ परिसरात सापळा लावून गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली. आरोपी गुन्हा करून मुंबईला आणि तिथून बाहेर अज्ञात ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी गुन्हे शाखेने आरोपीला बेड्या ठोकल्या. 

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मनोज लोहिया, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, महेश भालचिम, ऋषिकेश भोसुरे, योगेश कोळेकर, सागर जैनक, शशिकांत नांगरे, त्रिनयन बाळसराफ, सुधीर दांगट, समीर काळे, निखल फापाळे, रामदास मेरगळ, राजकुमार हनमंते, राहुल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Web Title: Chains to the offender; Murderer jailed for drowning toddler in boiling water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.