चाकण बाजार : कांद्याची आवक वाढून भावात घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 01:51 AM2019-02-04T01:51:30+5:302019-02-04T01:51:42+5:30

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घसरण झाली, तर बटाट्याची आवक घटून भावात वाढ झाली.

Chakan Bazar: Falling onion price | चाकण बाजार : कांद्याची आवक वाढून भावात घसरण

चाकण बाजार : कांद्याची आवक वाढून भावात घसरण

googlenewsNext

चाकण - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घसरण झाली, तर बटाट्याची आवक घटून भावात वाढ झाली. भुईमूग शेंगा व लसणाची आवक घटली. तरकारी बाजारात वाटाण्याची मोठी आवक वाढून भावात घसरण झाली. मेथी व कोथिंबिरीची आवक घटून भाव स्थिर राहिले. जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांच्या विक्रीत घट झाली. बाजारात एकूण साडेतीन कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक २९०९० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक ३०९० क्विंटलने वाढून भावात १५० रुपयांची घसरण झाली. कांद्याला ७५० रुपये भाव मिळाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १०१५ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक ८५ क्विंटलने घटून भावात ३०० रुपयांनी वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव ९०० रुपयांवरून १२०० रुपयांवर स्थिरावला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ४८३ पोती, वाटाण्याची १०३४ पोती, गवारीची ७८ पोती व टोमॅटोची ८९५ क्रेट्स आवक झाली. हिरव्या मिरचीला ४००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :
कांदा - एकूण आवक - २९०९० क्विंटल. भाव क्रमांक १ : ७५० रुपये, भाव क्रमांक : ४०० रुपये, भाव क्रमांक ३ : २०० रुपये.
बटाटा - एकूण आवक - १०१५ क्विंटल. भाव क्रमांक १ : १२०० रुपये, भाव क्रमांक २ : ९०० रुपये, भाव क्रमांक ३ : ७०० रुपये.
भुईमूग शेंग - एकूण आवक - ३ क्विंटल. भाव क्रमांक १ : ५५०० रुपये, भाव क्रमांक २ : ५००० रुपये, भाव क्रमांक ३ : ४७०० रुपये.
लसूण - एकूण आवक - ४ क्विंटल. भाव क्रमांक १ : २५०० रुपये, भाव क्रमांक : २००० रुपये, भाव क्रमांक ३ : १५०० रुपये.
फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :
हिरवी मिरची - ४८३ पोती (२५०० ते ४००० रु.), टोमॅटो - ८९५ पेट्या (४०० ते १००० ), कोबी - २८४ पोती ( ८०० ते १२००) ,
फ्लॉवर - ३९२ पोती (५०० ते १०००), वांगी - ४१२ पोती (१००० ते २०००), भेंडी - ४१२ पोती (२००० ते ३५००),
दोडका - २७४ डाग (२५०० ते ३५०० रु.), कारली - ३५२ डाग (२५०० ते ३५००), दुधीभोपळा - २५१ पोती (१००० ते २००० रु.),
काकडी - ३४५ पोती (१००० ते १८००), फरशी - १३० पोती (३००० ते ४००० रु.), वालवड - २४८ पोती (१००० ते २००० रु.),
गवार- ७८ पोती (५००० ते ६०००), ढोबळी मिरची- ५१४ डाग (२००० ते ३०००), चवळी - ७० डाग (१५०० ते २५००),
वाटाणा - १०३४ पोती (९०० ते १५००), शेवगा - ४० डाग (३००० ते ४०००), गाजर - २१६ डाग (९०० ते १४००)
पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :
मेथी - एकूण २१ हजार ५१३ जुड्या (१०० ते ४०० रुपये), कोथिंबीर- एकूण २४ हजार ३१० जुड्या (१०० ते ५००),
शेपू - एकूण २ हजार ४८४ जुड्या (५०० ते ९००), पालक - एकूण ५ हजार ६८९ जुड्या (३०० ते ५००).


बटाट्याची आवक घटून भावात वाढ

बटाट्याची आवक घटून भावात वाढ, भुईमूग शेंगा व लसणाची आवक घटली
गवार तेजीत, भाव ६००० रुपये क्विंटल, वाटाण्याच्या भावात घसरण
वाटाणा भाव १५ रुपये किलो, मेथी व कोथिंबिरीची आवक घटली.
जनावरांच्या विक्रीत घट, बाजारात साडेतीन कोटींची उलाढाल

Web Title: Chakan Bazar: Falling onion price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.