चाकण : बस ओनर्स असो.च्या अध्यक्षपदी भेगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:43+5:302021-07-21T04:08:43+5:30
पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची नुकत्याच झालेल्या कोअर कमिटी मिटिंगच्या बैठकीत एक मताने निर्णय घेऊन, दत्तात्रय भेगडे यांची अध्यक्षपदी ...
पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची नुकत्याच झालेल्या कोअर कमिटी मिटिंगच्या बैठकीत एक मताने निर्णय घेऊन, दत्तात्रय भेगडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष- भालचंद्र ऊर्फ बाळासाहेब बोराटे,
कार्याध्यक्ष- दिपक कलापुरे,सचिव- बंटी भालेकर,
खजिनदार - दशरथ पानमंद तर सल्लागार- काळूराम गायकवाड,प्रमोद बागलाने,देवदत्त रावल यांची निवड करण्यात आली.
बस वाहतूक व्यावसायिकांना न्याय मिळवून देणे, बँका,फायनान्स कंपन्या यांच्याकडून वारंवार होणारा त्रास कमी करणे,परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळवून देणे, परिवहन कर व वाहन विमा यामध्ये सवलत मिळवून देणे, मिळालेल्या संधीचे सोने करत असताना वाहनधारक व्यवसाय बंधूंना या कठीण काळातून बाहेर काढून मदत करणे व पुनर्वसन करणे हीच आपली जबाबदारी असल्याचे भेगडे यांनी सांगितले.