चाकण बाजारात कांदा आवक सहा हजार क्विंटलने वाढली, भावात १००० रुपयांची घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 04:41 PM2018-01-14T16:41:20+5:302018-01-14T16:41:33+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात वाढ झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा भावात १००० रुपयांनी घसरण झाली.
- हनुमंत देवकर
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात वाढ झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा भावात १००० रुपयांनी घसरण झाली. कांद्याला प्रतिक्विंटल ३००० रुपये भाव मिळाला. कांदा बाजारात २ कोटी ८२ लाखाची उलाढाल झाली. बटाट्याची आवक वाढून भाव स्थिर राहिले आहेत. बाजारातील एकूण उलाढाल ५ कोटी ५० लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १४१००० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक ६१०० क्विंटलने वाढून भावात १००० रुपयांनी घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव ४००० रुपयांवरून ३००० रुपयांवर स्थिर राहिला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १७०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८०० क्विंटलने वाढून बटाट्याचा कमाल भाव १००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावला. भूईमुग शेंगाची एकूण आवक ४३ क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव ६००० रुपयांवर स्थिर राहिला. लसणाची एकूण आवक ११ क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव ४ हजार रुपयांवर स्थिर राहिला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ६५४ पोती झाली असून, हिरव्या मिरचीचा कमालभाव ३५०० रुपयांवर स्थिर राहिला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :
कांदा - एकूण आवक - १४१०० क्विंटल. भाव क्रमांक १ : ३००० रुपये, भाव क्रमांक : २००० रुपये, भाव क्रमांक ३ : १००० रुपये.
बटाटा - एकूण आवक - १७०० क्विंटल. भाव क्रमांक १ : १००० रुपये, भाव क्रमांक २ : ७०० रुपये, भाव क्रमांक ३ : ५०० रुपये.
भुईमूग शंग - एकूण आवक - ४३ क्विंटल. भाव क्रमांक १ : ६००० रुपये, भाव क्रमांक २ : ५००० रुपये, भाव क्रमांक ३ : ३००० रुपये.
लसूण - एकूण आवक - ११ क्विंटल. भाव क्रमांक १ : ४००० रुपये, भाव क्रमांक २ : ३५०० रुपये, भाव क्रमांक ३ : ३००० रुपये.
फळभाज्या :-
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति १०० किलोंसाठी डागाना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :-
टोमॅटो - ९२९ पेट्या ( ५०० ते ८०० रू. ), कोबी - २९५ पोती ( ५०० ते १००० रू. ), फ्लॉवर - ३४८ पोती ( ८०० ते १२०० रु.),
वांगी - २३२ पोती ( २००० ते ३००० रु.), भेंडी - ४१६ पोती ( ३००० ते ४००० रु.), दोडका - १४५ पोती ( ३००० ते ४५०० रु.),
कारली - १९२ डाग ( ३५०० ते ४००० रु.), दुधीभोपळा - १९५ पोती ( ६०० ते १२०० रु.), काकडी - १९२ पोती ( १००० ते २००० रु.),
फरशी - ७० पोती ( ३००० ते ४००० रु.), वालवड - ३१५ पोती ( २००० ते ५००० रु.), गवार - ७० पोती ( ४००० ते ६००० रू.),
ढोबळी मिरची - ४१५ डाग ( २५०० ते ४५०० रु.), चवळी - ६२ पोती ( २००० ते ३००० रुपये ), वाटाणा - ७८० पोती ( २००० ते ३००० रुपये), शेवगा - ६१ डाग ( ४००० ते ६००० रु. ) गाजर - २०० पोती ( १६० ते २०० रु. )
पालेभाज्या :
चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : -
मेथी - एकूण २१४६२ जुड्या ( ४०० ते ७०० रुपये ), कोथिंबीर - एकूण ३१९४५ जुड्या ( १०० ते ३०० रुपये ), शेपू - एकूण ८९१० जुड्या ( २०० ते ५०० रुपये ), पालक - एकूण ८४१५ जुड्या ( २०० ते ३०० रुपये ).
जनावरे :-
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १३५ जर्शी गायींपैकी ८५ गाईची विक्री झाली. ( १५,००० ते ५०,००० रुपये ),
२१८ बैलांपैकी १०७ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ३०,००० रुपये ), १२५ म्हशींपैकी ८२ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ६०,००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९३२० शेळ्या - मेंढ्यापैकी ८७५० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १५०० ते १०,००० रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात २ कोटी ३० लाखाची उलाढाल झाली.