चाकण पोलिसांचा काळूसमध्ये बेकायदा हातभट्टीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:06 AM2021-03-30T04:06:57+5:302021-03-30T04:06:57+5:30

काळूस गावच्या हद्दीतील भामा नदीकिनारी बेकायदा हातभट्टीची दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती गुप्त बतमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली होती.त्यानुसार ...

Chakan police raid illegal kiln in Kalus | चाकण पोलिसांचा काळूसमध्ये बेकायदा हातभट्टीवर छापा

चाकण पोलिसांचा काळूसमध्ये बेकायदा हातभट्टीवर छापा

Next

काळूस गावच्या हद्दीतील भामा नदीकिनारी बेकायदा हातभट्टीची दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती गुप्त बतमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली होती.त्यानुसार या ठिकाणी चाकण पोलिसांनी रविवारी ( दि.२८ ) संध्याकाळी चारच्या दरम्यान हा छापा टाकला.एक इसम व एक महिला असे दोघे जण हातभट्टीची दारू काढण्याचे काम करत होते.त्यांना पोलिसांची चाहूल लागताच,इसमाने छोट्याशा टेकडीवरून नदीच्या पाण्यात उडी मारून पळून जात असताना, पोलिसांनी त्याला आवाज देऊन थांबण्याचा इशारा दिला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

पोलिसांना या छाप्यात मानवी जीवितास घातक ठरेल असे रसायन टाकून गुंगी येणारी विषारी हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जागेवरच फोडले, दारू बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेले प्लॅस्टिकचे कॅन ही या छाप्यात नष्ट करण्यात आले तर हात भट्टीची दारू तयार करण्यासाठी या ठिकाणी वापरत असलेले रसायन व इतर साहित्य असा सुमारे हजारो रूपयांचा माल नष्ट केला आहे.यामध्ये २००० लिटरचे दोन भोपळे लोखंडी बॅरल,कच्चे रसायन, ३५ लिटरचे प्लॅस्टिक कॅन,२०० लिटर जळके रसायन,अंदाजे १,८०० लिटर हातभट्टीचे रसायन हे साहित्य जागेवर नष्ट करण्यात आले,बाकी ९७,६५० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळूस गावच्या हद्दीतील भामा नदी किनारी झाडाझुडपांमध्ये बेकायदा हातभट्टीची दारू प्रकरणी मंजिला उत्तमसिंग राठोड ( वय ३०, रा. तुकाईवस्ती,काळूस ), उत्तमसिंग रामकुमार राठोड ( वय ४५,रा.तुकाईवस्ती,काळूस) अशा दोघां पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अनिल देवरे,विक्रम गायकवाड,दत्ता जाधव,सुरेश हिंगे,संदीप सोनवणे,मच्छिंद् भांबुरे,विलास कांदे,निखिल वर्पे,मनोज साबळे या पोलीस पथकाने कारवाई केली

काळूस येथील भामा नदी किनारी असलेली हातभट्टी दारू नष्ट करताना पोलीस.

Web Title: Chakan police raid illegal kiln in Kalus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.