चाकण-शिक्रापूर महामार्ग ‘खड्ड्यांत’, नागरिकांनी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:09 AM2017-11-28T03:09:47+5:302017-11-28T03:10:00+5:30

चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावर साबळेवाडी, बहुळ, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे आणि रासे गावांच्या हद्दीत मोठमोठे धोकादायक खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहेत.

 Chakan-Shikrapur highway 'Khadindant', despite repeated demands from the public works department ignored | चाकण-शिक्रापूर महामार्ग ‘खड्ड्यांत’, नागरिकांनी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

चाकण-शिक्रापूर महामार्ग ‘खड्ड्यांत’, नागरिकांनी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Next

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावर साबळेवाडी, बहुळ, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे आणि रासे गावांच्या हद्दीत मोठमोठे धोकादायक खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहेत. रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसंदर्भात नागरिकांकडून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी वाहतुकीदरम्यान रस्त्यावरील दुचाकीस्वारांना तसेच मोठ्या वाहनांना समस्यांचा सामना करत मार्गस्थ व्हावे लागत आहे.
चाकण-शिक्रापूर हायवे रस्ता हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडणारा मार्ग आहे. मुंबईहून अहमदनगरकडे जाणाºया अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक याच मार्गाचा प्रवासासाठी अवलंब करत आहेत.
औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल परराज्यांतून घेऊन येणारी अनेक मोठी वाहनेही येथूनच सातत्याने प्रवास करत आहेत. परिणामी राज्य महामार्गावर वाहनांची वर्दळ कमालीची वाढू लागली आहे. मात्र रस्त्यावर बहुतांश ठिकाणी जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे.
शेलपिंपळगाव, बहुळ, चौफुला, साबळेवाडी, भारत गॅस फाटा, शेलगाव, दत्तवाडी, आळंदी फाटा, कडाचीवाडी आदी ठिकाणी भर रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, काही खड्ड्यांमधून पाण्याचा निचरा होत आहे.
परिणामी रात्रीच्या वेळी या पडलेल्या खड्ड्यांभोवती रस्ता निसरडा होत आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला खड्ड्यांचा तसेच पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने घसरून पडल्याच्या अनेक घटना वाढत चालल्या आहेत.
रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती, साईडपट्ट्या भरणे, गवत काढणे, सूचना फलक लावणे अशी विविध कामे प्रतीक्षेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, अध्यक्ष शरद मोहिते, जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, संचालक धैर्यशील पानसरे, आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश मोहिते, माहिती सेवा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पºहाड, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष आवटे, पुणे जिल्हा भाजपा कामगार आघाडी सरचिटणीस गणेश
दळवी, खेड तालुका राष्ट्रवादी
युवक काँग्रेसचे सरचिटणीस राजेश म्हस्के, माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष साबळे, माजी उपसरपंच तुषार निकम, शेलगावचे सरपंच नागेश आवटे, बहुळचे सरपंच गणेश वाडेकर, माजी उपसरपंच बाळासाहेब कड, उपसरपंच एकनाथ आवटे आदींसह वाहतूकदारांनी केली आहे.

धोकादायक फांद्यांची छाटणी करा...

चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गालगत मोठमोठी धोकादायक झाडे आहेत. काही झाडे जीर्ण झाली असून, झाडांच्या फांद्या पूर्णपणे वाळल्या आहेत. त्यामुळे अशा फांद्या कधी रस्त्यावर पडतील याचा नेम नाही.
यापूर्वी धोकादायक झाडे व झाडांचे फाटे रस्त्यावर कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. शेलपिंपळगाव येथील धोकादायक वळण रस्त्यावर झाडाचा फाटा अनेक दिवसांपासून लोंबकळत आहे. त्यामुळे अशा धोकादायक झाडांचे फाटे रस्ता दुरुस्ती विभागाने
तत्परता दाखवून कायमस्वरूपी हटवण्याची गरज निर्माण झाली आहे.
शासनाने राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा
संकल्प केला आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील काही
रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु चाकण-शिक्रापूर राज्य महामार्ग अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, वाहतूकदारांसाठी धोकादायक
ठरत आहे.

दर्जाहीन दुरुस्ती...
राज्य महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे बुजविण्याचे काम रस्ता दुरुस्ती विभागाने यापूर्वी केले आहे. परंतु खड्ड्यांमध्ये मुरूम किंवा फक्त ठिगळे लावून हे खड्डे बुजविले होते. अद्याप कधीही रस्त्यावर पडलेल्या खडड्ड्यांना डांबर टाकून बुजविले नसल्याने हे खड्डे रौद्ररूप धारण करत आहेत. तर कधीकधी स्थानिक गावातील नागरिक पुढाकार घेऊन स्वखचार्तून हे खड्डे बुजवत आहेत.
 

Web Title:  Chakan-Shikrapur highway 'Khadindant', despite repeated demands from the public works department ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.