चाकण व्यापारी महासंघाने दुकाने उघडण्यास मागितली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:04+5:302021-04-10T04:10:04+5:30

चाकण : 'सांगा आम्ही जगायचे कसे आणि आमच्या अवलंबून असणाऱ्या कामगारांना जगवायचे कसे, असा सवाल करीत नियम व अटींवर ...

Chakan Traders Federation seeks permission to open shops | चाकण व्यापारी महासंघाने दुकाने उघडण्यास मागितली परवानगी

चाकण व्यापारी महासंघाने दुकाने उघडण्यास मागितली परवानगी

Next

चाकण : 'सांगा आम्ही जगायचे कसे आणि आमच्या अवलंबून असणाऱ्या कामगारांना जगवायचे कसे, असा सवाल करीत नियम व अटींवर सोमवारपासून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, अन्यथा आदेश झुगारून दुकाने सुरू करू, असा इशारा चाकण व्यापारी महासंघाच्या वतीने या वेळी देण्यात आला.

या वेळी चाकण व्यापारी महासंघाचे पदाधिकारी किरण मांजरे,संदीप परदेशी,आप्पासाहेब कड, उमेश गोरे, अनिल सोनवणे, ईश्वर कर्नावट, चंद्रकांत गोरे,विजय शहा,अशोक सांकला,सुनील वाईकर,रमेश कांडगे,देवेन मेहता,संतोष घनवट,गणेश जगताप,संदीप हासे,भाऊसाहेब गाजरे,शरद मुंगशे,जेठराम चौधरी आदी व्यापारी उपस्थित होते.

राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शुक्रवार ( दि.९) रोजी सकाळी शहरातील १०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन नगरपरिषदचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे व पोलिसांना रीतसर निवेदन देण्यात आले.तसेच सरकारच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला. सरकारने घेतल्या संचारबंदीचा आम्ही निषेध करतो.चाकण परिसरातील सर्व दुकाने सुरू असताना फक्त शहरातीलच व्यापाऱ्यांवर अन्याय का केला जात आहे.सोमवारी कसल्या परिस्थितीत आम्ही आमची दुकाने उघडणार आहोत. काय कारवाई करावयाची असेल, तर ती करावी. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे नाही पण बंदमुळे व्यापाऱ्यांवर मरणाची वेळ आली आहे. कामगारांचे पगार, वीजबिल, जीएसटी अशा अनेक गोष्टींसाठी आम्ही पैसे कुठून आणणार, असा संतप्त सवाल अनिल सोनवणे यांनी केला.

संचारबंदीमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. राज्य शासनाने नियम व अटी लागू करून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. त्याचबरोबर विद्युतदरात कपात करावी. जीएसटी, शाळेची फी, मालमत्ता कर, वैधानिक शुल्क माफ करावे.

संदीप परदेशी, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स.

०९ चाकण

चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांना निवेदन देताना व्यापारी.

Web Title: Chakan Traders Federation seeks permission to open shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.