चाकणला काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:07+5:302021-07-17T04:09:07+5:30
यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महेश ढमढरे, संग्राम मोहोळ, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव वंदना सातपुते, जिल्हा किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ...
यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महेश ढमढरे, संग्राम मोहोळ, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव वंदना सातपुते, जिल्हा किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे, जिल्हा अल्पसंख्याक कॉंग्रेसचे अध्यक्ष जमीरभाऊ काझी, तालुका अध्यक्ष विजय डोळस, महिला अध्यक्ष जया मोरे, चाकण शहर अध्यक्ष आनंद गायकवाड, सरुबाई करंडे, भास्कर तुळवे, सुनील मिंडे, काळूराम कड, गीताबाई मांडेकर, अनिल देशमुख, अत्तिक पाटील, आतिश मांजरे, निखिल थिगळे यांच्यासह पदाधिकारी संख्येने उपस्थितीत होते.
काँग्रेस कमिटीच्या वतीने हातगाडीवर दुचाकी, गॅस सिलिंडर ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा काँग्रेस पक्षाचे संग्राम मोहळ यांनी सांगितले की, महामारीने सततच्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडले नोकऱ्या गेल्या अशा परिस्थितीत महागाई वाढल्याने देशातील गरिबांना जगणे मुश्किल झाले आहे.
आंबेठाण चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन.