चाकणला महालसीकरण मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:11 AM2021-09-27T04:11:39+5:302021-09-27T04:11:39+5:30
यावेळी चाकण नगर परिषदचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, आरोग्य अधिकारी डॉ. नंदा ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, शहराध्यक्ष राम ...
यावेळी चाकण नगर परिषदचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, आरोग्य अधिकारी डॉ. नंदा ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, शहराध्यक्ष राम गोरे, उपजिल्हाध्यक्ष राहुल नायकवाडी, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, विलास कतोरे, तालुकाध्यक्षा संध्या जाधव, अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोबीन काझी, नगरसेवक प्रकाश भुजबळ, शहराध्यक्षा स्मिता शहा, प्रतिभा पवार आदी उपस्थित होते.
चाकण औद्योगिक वसाहतीने वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खेड तालुक्यासाठी पन्नास हजार कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. चाकण शहरासाठी पाच हजार लसीचे डोस शहरातील पंधरा रुग्णालयांना वितरित करण्यात आले असून, या रुग्णालयात लसीचे डोस नागरिकांना मोफत देण्यात आले आहेत. चाकण ग्रामीण रुग्णालय आणि नगर परिषदेच्या मार्गदर्शनाखाली हे महा लसीकरण सुरू करण्यात आले. चाकण शहरातील लसीकरण केंद्रांवर सकाळीच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लावलेल्या दिसत होत्या.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, कोविशिल्ड लसींचा साठा आहे तोपर्यंत हे लसीकरण सुरू राहणार आहे. त्यामुळे चाकण शहरातील लोकांनी गर्दी न करता संयमाने आणि रांगेत उभे राहून लसीकरण करावे. प्रत्येकाने लस घेण्यापूर्वी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि मोबाइल नंबर जवळ ठेवावा.
२६ चाकण लसीकरण
चाकण ग्रामीण रुग्णालयात महा लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करताना दिलीप मोहिते-पाटील.
260921\img-20210926-wa0028.jpg
चाकण ग्रामीण रुग्णालयात महा लसीकरण मोहिमेची सुरुवात करताना.