चाकणच्या आंबेठाण चौकाने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:45+5:302021-06-25T04:08:45+5:30

-- चाकण : चाकण नगरपरिषद व पोलीस यांच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत पुणे नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक येथील अतिक्रमणांवर ...

Chakan's Ambethan Chowk took a deep breath | चाकणच्या आंबेठाण चौकाने घेतला मोकळा श्वास

चाकणच्या आंबेठाण चौकाने घेतला मोकळा श्वास

--

चाकण : चाकण नगरपरिषद व पोलीस यांच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत पुणे नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक येथील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली. या भागातील तब्बल १५ व्यावसायिक दुकाने आणि दोन बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आली. पुणे नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक येथील चाकण नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ११ मधील सुमारे १५ अतिक्रमणे आणि होर्डिंग लावण्याचे लोखंडी सांगाडे धडक कारवाई करून काढण्यात आल्याने अनेक अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.

आंबेठाण चौक येथील अतिक्रमणांच्या बाबत वैशाली कॉम्प्लेक्स सहकारी गृहरचना संस्था यांच्याकडून चाकण पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याबाबत चाकण पालिकेने संबंधित सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यातील काहींनी आपापली दुकाने स्वतःहून काढून घेतली, उर्वरित अतिक्रमणे चाकण पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटवली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये शिवमल्हार पान स्टॉल, बालाजी वडेवाले, धाडगे अमृततुल्य, श्री ऑटो गॅरेज , चिकन सेंटर, न्यू आकाश ऑटोमोबाईल आदी पंधरा व्यावसायिक वापरासाठी उभारण्यात आलेली दुकाने व दोन होर्डिंगचे सांगाडे या कारवाईमध्ये जमीन दोस्त करण्यात आली.

चाकण पालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते व नगरसेवक किशोर शेवकरी यांना कारवाईने मोठा धक्का बसला आहे. शेवकरी यांच्याच इमारतीसमोर सदरची दुकाने होती. मात्र याच इमारतीच्या सोसायटीने तक्रारी केल्याने सदरची कारवाई चाकण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली आहे. चाकण पालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित अतिक्रमणे पालिका पोलीस बंदोबस्तात काढून घेत आहे. दरम्यान चाकण आंबेठाण चौकातील अतिक्रमणे काढण्यात आल्याने या चौकाने अनेक वर्षांनी मोकळा श्वास घेतला आहे.

--

चौकट

बड्या अतिक्रमणांवर हातोडा कधी ?

--

औद्योगिकरणामुळे अवजड वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली रहदारी व अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे यामुळे चाकण शहराचा श्वास कोंडला आहे. शहराचा श्वास कोंडणारी अनेक बड्या मंडळींची अतिक्रमणे शहरभर आणि एमआयडीसी भागात आहेत. मात्र अशा बड्या मंडळींच्या डोळ्यात डोळे घालण्याची हिम्मत कुणीही करत नसल्याने अशा अतिक्रमणांवर कोण बुलडोझर फिरवणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

* वैशाली कॉम्प्लेक्स रहिवाशी यांच्या तक्रारीवरून संबंधित अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस देण्यात आलेली होती. तथापि दिलेल्या मुदतीत त्यांनी स्वतः हून अतिक्रमण न काढल्यामुळे नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तात सदरचे अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे.

- नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद.

-----------------------------------------------------

फोटो ओळ : २४चाकण अतक्रिमण जमीनदोस्त

* फोटो - चाकण येथील आंबेठाण चौकातील अतिक्रमण जमीनदोस्त करताना

===Photopath===

240621\24pun_8_24062021_6.jpg

===Caption===

फोटो ओर्ळ : २४चाकण अतक्रिमण जमिनदोस्त * फोटो - चाकण येथील आंबेठाण चौकातील अतिक्रमण जमीनदोस्त करताना

Web Title: Chakan's Ambethan Chowk took a deep breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.