आमदाबादला शेतकऱ्यांचा चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:11 AM2021-02-08T04:11:01+5:302021-02-08T04:11:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क टाकळी हाजी : आमदाबाद (ता. शिरूर) येथे शेतकऱ्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी हाजी : आमदाबाद (ता. शिरूर) येथे शेतकऱ्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिरुर-राजगुरुनगर या राज्यमार्गावर शेतकऱ्यांनी शेती विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, यासाठी आंदोलन केले.
जय जवान जय किसान, शेतकरी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
सरकारने लागू केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. शेतकऱ्यांना मागणी न करताही ते का लागु केले ? या देशातील बहुतांश शेतकरी अत्यल्प भू धारक आहे. या मुळे नेमके हित कोणाचे ? असे प्रश्न आंदोलकांनी यावेळी उपस्थित केले. दिल्लीतील संयुक्त किसान मोर्चा आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शेतकरी बी. आर. माशेरे, योगेश थोरात, अशोक माशेरे, आबा जाधव, लक्ष्मण पवार, गंगाधर माशेरे, भाऊसाहेब माशेरे, संदिप पवार, रामभाऊ माशेरे, पोपट घुले, गोटीनाना माशेरे, फक्कड जाधव, आशोक थोरात, भाऊसाहेब जाधव, साईनाथ घुले, मंगेश थोरात, आक्षय माशेरे, भरत जाधव तसेच आदी शेतकरी आपला ट्रॅक्टर घेऊन आंदोलनाला उपस्थित होते. या वेळी पोलिस निरीक्षक बिरुदेव काबुगडे व राजेंद्र गोपाळे यांना निवेदन देण्यात आले
फोटो : आमदाबाद फाटा येथे दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या पांठिब्यासाठी केलेल्या आंदोलना प्रसंगी शेतकरी नेते नितीन थोरात, योगेश थोरात, अशोक माशेरे व ग्रामस्थ यांच्या कडुन निवेदन स्विकारताना पोलिस अधिकारी बिरुदेव काबुगडे