मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:07+5:302021-06-27T04:08:07+5:30
राज्य सरकारच्या चुकीमुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे.ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. राज्य ...
राज्य सरकारच्या चुकीमुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे.ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकारने ओबीसींची योग्यप्रकारे भूमिका न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाले आहे.भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्या पाठीमागे उभे राहून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, सरकारने सहकार्य न केल्यास प्रत्येक गावागावांत आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांनी चक्काजाम आंदोलनाप्रसंगी दिला आहे.
भारतीय जनता पार्टीने राज्यभरात चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयसिंग एरंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.सोशल डिस्टन्स नियम पाळून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते न जमविता ठराविकच कार्यकर्त्यांसमवेत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे,मंचर शहर भाजपा अध्यक्ष नवनाथ थोरात यांनी मनोगत व्यक्त करत सरकारवर कडाडून टीका केली. याप्रसंगी संदीप बाणखेले,ओबीसी आघाडी प्रमुख सुरेश अभंग,रोहन खानदेशे, सोमनाथ फल्ले,संजय अभंग,पंकज भालेराव गोविंद तामशीकर,संतोष पारधी रवी भालेराव आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.