कंत्राटी कामगारांचे कंपनी विरोधात चक्री उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:25 AM2018-04-06T02:25:14+5:302018-04-06T02:25:14+5:30

कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे मत या कामगारांनी व्यक्त केले आहे.

Chakri Fertility Against Company Of Contract Workers | कंत्राटी कामगारांचे कंपनी विरोधात चक्री उपोषण

कंत्राटी कामगारांचे कंपनी विरोधात चक्री उपोषण

googlenewsNext

कुरकुंभ - कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे मत या कामगारांनी व्यक्त केले आहे.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये अ‍े -८८ मधील आॅनर ह्या कंपनीत ओम इंजिनिअरींग नावाने असणाºया कंत्राटात वरील उपोषणास बसलेले कामगार काम करीत होते. मात्र, काही कारणास्तव वरील कंत्राटदाराने आपले कंत्राट सोडून दिल्याने हे कामगार देखील कामावरून बाहेर झाले. मात्र, हे कामगार तालुक्यातील असल्याने त्यांनी आम्ही जवळपास चार वषार्पासून कामाला आहोत. त्यामुळे कंत्राटदार जरी गेला असला तरी आम्हाला कामावर घ्यावे अशी मागणी केली. मात्र, कंपनीने ती अमान्य केली आहे. परिणामी केलेल्या चार वर्षाच्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळावा यासाठी त्यांनी हे उपोषण सुरु केले आहे.
दिवसेंदिवस कामगार कायद्यात झालेल्या बदलाने खाजगी कारखानदार कंत्राट पद्धतीचा वापर करीत आहेत. त्यामुळे कंत्राटाची मर्यादा संपली कि कामगार कामावरून बेदखल होत आहेत. सर्वच ठिकाणी असंघटीत कामगार संखेत वाढ होत असल्याने कामगारांच्या बºयाच मागण्या ह्या व्यवस्थापनाकडून ग्राह्य धरल्या जात नाहीत. परिणामी कामगार व कंपनी व्यवस्थापन हा वाद नेहमीच होताना दिसून येतो. दरम्यान कामगार हा नेहमीच कामाची जागा अगदी अल्पावधीत बदलत असल्याने त्यामुळेही बºयाचदा त्यांना कायमस्वरूपी होणे अवघड असते.
वरील चक्री उपोषण करणाºया कामगारांनी कामगार न्यायालयात धाव घेवून त्यांच्यावर झालेल्या अन्याय विरोधात दाद मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ असल्याने याबाबत नक्की काय निकाल येणार हा अजून येणारा काळ सांगणार आहे. मात्र तो पर्यंत सुरु झालेल्या ह्या उपोषणाने कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्या मधील दुरावा आणखीनच वाढवला आहे यात शंका नाही मात्र या संघर्षात कामगार व व्यवस्थापन याचं नुकसान होणार हे निश्चित आहे.

आम्ही गेल्या चार वर्षापासून या कंपनीत कामास आहोत. कंत्राटदार मार्फत कामास असलो तरी आम्ही स्थानिक आहोत. कंत्राट जरी संपले असले तरी आमच्या बाबतीत साकाराकात्मक विचार करणे गरजेचे आहे. चार वर्षातील पी एफ व अन्य झालेल्या नुकसानभरपाई देण्यात यावी.
- हनुमंत निगडे, पिडीत कामगार

कंपनीने पाहिले सहा महिने प्रायोगिक तत्वावर काम दिले होते व पुढील काळात सर्व शासकीय नियमानुसार वेतन व अन्य कामगार हिताचे नियम सुरु करून देणार होते मात्र कंपनीने चार वर्षापर्यंत काहीच दिले नाही परिणामी काम सोडण्यास भाग पडले.
- रामराव गिरिमकर,
कंत्राटदार ओम इंजीनिअरिंग

कामगार हे कंपनीच्या मार्फत दिल्या गेलेल्या ओम इंजिनिअरिंग या कंत्राटदार कंपनी कडे होते. या कंत्राटदार कंपनीने स्वत:हून त्यांचे काम सोडून दिल्याने हे कामगार कामावरून बंद झाले आहेत. प्रत्यक्षरित्या त्यांचा व कंपनीचा काही एक सबंध नाही. त्याला स्वर्वस्वी कंत्राटदार जबाबदार असून सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यावरच याबाबत आणखी बोलणे उचीत राहील.
- दस्तगीर मुजावर, व्यवस्थापन अधिकारी आॅनर.

Web Title: Chakri Fertility Against Company Of Contract Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.