मागण्या मान्य होईपर्यंत चाळकवाडी टोलनाका बंदच: सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 AM2021-04-02T04:10:02+5:302021-04-02T04:10:02+5:30
दरम्यान, सोनवणे यांनी मागणीचे निवेदन टोलप्रशासनाला दिले आहे. यावेळी नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, आनंद रासकर, पिंपळवंडी गावचे उपसरपंच ...
दरम्यान, सोनवणे यांनी मागणीचे निवेदन टोलप्रशासनाला दिले आहे. यावेळी नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, आनंद रासकर, पिंपळवंडी गावचे उपसरपंच प्रदीप चाळक उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्गाची अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे अर्धवट कामे पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, स्थानिकांना नोकऱ्या, जुन्नर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमधून मुक्तता मिळावी आदी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा टोलनाका सुरू करू देणार नसल्याचे म्हटले आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही टोल सुरू करण्यास विरोध केला असून त्यांच्या वतीनेही टोल प्रशासनास हा टोल बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यासंदर्भात, शिरूरचे खासदार डाॅ . अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व पोलिस प्रशासन
यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे या निवेदनात म्हटले आहे.
०१ आळेफाटा