न्हावी-पळसदेव रस्त्याची ‘चाळण’, कारवाईची मागणी; तात्पुरती डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:21 AM2018-03-13T01:21:41+5:302018-03-13T01:21:41+5:30
न्हावी-पळसदेव रस्त्यावर काही शेतकºयांनी पाइपलाइनसाठी ठिकठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण केली आहे.
न्हावी : न्हावी-पळसदेव रस्त्यावर काही शेतकºयांनी पाइपलाइनसाठी ठिकठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण केली आहे. शेतीच्या पाण्याची व्यवस्था म्हणून नदीवरून किंवा तत्सम ठिकाणांहून पाइपलाइन आणतात. परंतु, त्या पाइपलाइन मार्गात जर डांबरी रस्ता आला तर तो सर्रासपणे खोदून त्यातून ती नेतात. नंतर त्या रस्त्यावर तात्पुरती डागडुजी करून त्यावर पडदा टाकतात. रस्तेखोदाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची रितसर परवानगी न घेता हा सगळा प्रकार सर्रासपणे दिसत आहे.
पळसदेव-न्हावी रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच, शेतमालाची वाहतूक करताना बºयाच वेळा वाहन अपघात घडतात. स्वार्थासाठी खोदलेल्या रस्त्यावर माती टाकून तो बुजवन्याचा प्रयत्न केला जातो. तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करून अशा लोकांवर योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना वाहने चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याचा परिणाम दळणवळणावर मोठ्या प्रमाणात होतो आहे. याबात ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन हा रस्ता त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी,नागरीकांनी केली आहे.
पाईपलाईन टकाण्यासाठी कोणतीही परवानगी नघेता शेतकरी रस्ते खोदत आहेत.
काम झाल्यानंतर ते वेड्याा वाकड्या पध्दतीने बुजवून रस्ता अडचणीचा करुन ठेवत आहेत.
त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यात अचानक अडथळा येत आल्यामुळे प्रवासी नागरीकांना पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.