सवाईचे महात्म्य टिकविण्याचे नवोदितांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:56 PM2018-12-11T18:56:18+5:302018-12-11T19:04:40+5:30

महोत्सवाच्या स्थापनेपासूनच भारतीय अभिजात संगीत विश्वातील दिग्गज कलावंतांना या स्वरमंचावर ऐकण्याची रसिकांना सवय झाली आहे.

Challenge before new artists to save the glory of Sawaii | सवाईचे महात्म्य टिकविण्याचे नवोदितांसमोर आव्हान

सवाईचे महात्म्य टिकविण्याचे नवोदितांसमोर आव्हान

Next
ठळक मुद्देयंदाच्या वर्षीपासून मुकुंदनगर मधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलच्या जागेत स्थलांतरित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उद्या ( बुधवार) पासून सुरूवात यंदा 13 नवोदित कलाकारांना महोत्सवात संधी

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात भारतीय अभिजात संगीत विश्वात मानाचे स्थान मिळविलेल्या दिग्गज कलावंतांपेक्षा नवोदित कलाकारांची संख्या अधिक आहे.  त्यामुळे नव्या जागेत सवाईचे सूर प्रस्थापित करण्याचे मोठे शिवधनुष्य या नवोदितांना पेलावे लागणार आहे. या कसोटीवर ते पूर्णपणे उतरणार का? याकडे संगीतप्रेमींचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून पेठेच्या संस्कृतीमध्ये रूळलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षीपासून मुकुंदनगर मधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलच्या जागेत स्थलांतरित झाला आहे. देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उद्या ( बुधवार) पासून दिमाखात सुरूवात होत आहे.या पेठेबाहेरच्या पुण्यात पुन्हा नव्याने महोत्सव स्थिरस्थावर करणे हेच आता आयोजकांपुढचे मोठे आव्हान आहे. महोत्सवाच्या स्थापनेपासूनच भारतीय अभिजात संगीत विश्वातील दिग्गज कलावंतांना या स्वरमंचावर ऐकण्याची रसिकांना सवय झाली आहे. दरवर्षी एक वर्षाआड महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ व्हायोलिनवादक एन.राजम यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील विविध कलावंतांची महोत्सवात हमखास वर्णी लावली जाते. पण यंदा यातील एकही कलाकार महोत्सवात दिसणार  नाही. आयोजकांनी पं. बिरजू महाराज, उस्ताद शाहीद परवेज,पं. उल्हास कशाळकर, बेगम परवीन सुलताना अशा  काही मान्यवर कलावंताना सोडले तर यंदा 13 नवोदित कलाकारांना महोत्सवात संधी दिली आहे. गतवर्षी महोत्सवात 9 नवोदित कलाकार होते. यंदा ही संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे  नव्या जागेत महोत्सव स्थिरस्थावर करण्याची भिस्त याच नवोदितांवर आहे. सवाईमध्ये आपली कला सादर करण्याची प्रत्येक नवोदित कलाकाराचे स्वप्न असते. यंदाच्या वर्षी नवोदितांसाठी ही कसोटी ठरणार आहे. मात्र ज्येष्ठ रसिकमंडळींनी महोत्सवात नवोदितांपेक्षाही दिग्गज कलावंतांच्या सादरीकरणाला काहीसे झुकत माप दिले आहे.
-----------------------------------------------------------
भविष्यात हा महोत्सव नवोदित कलाकारांमुळे ओळखला जाण्याची शक्यता आहे. ज्यात गैर काहीच नाही. पण याच  आम्ही महोत्सवात पं. फिरोज दस्तूर, सरस्वतीबाई राणे, किशोरी आमोणकर, पं. भीमसेन जोशी यांच्यासह देशभरातीलअनेक मान्यवर गायकांच्या मैफली अनुभवल्या आहेत, त्याची आठवण आजही मनात आहे. या कलावंतांना समोर बसून ऐकण हा अनुभव काहीसा वेगळाच आहे. त्यामुळे महोत्सवात नवोदितांबरोबर दिग्गज कलावंतांचे अविष्कारही अधिकाधिक अनुभवायला मिळावेत अशी अपेक्षा ज्येष्ठ रसिकमंडळींनी व्यक्त केली आहे.
------------------------------------------------------------
यंदाच्या महोत्सवातील कलाकार पाहिले तर नवोदित कलाकार अधिक आहेत. जी चांगली गोष्ट आहे. नवोदितांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. कारण शेवटी तेच हा सांगीतिक वारसा पुढे नेणार आहेत. मात्र आमच्यासारख्या कलावंतांना अजूनही ‘जुनं तेच सोन’ वाटत असल्याने ज्येष्ठ कलावंतांचे अविष्कार अनुभवणे ही आमच्यासाठी सुखद पर्वणी असते- वासुदेव कुलकर्णी
------------------------------------------------------------
इतर महोत्सवाची तिकिट ही आमच्यासारख्या लोकांना फारशी परवडणारी नसतात त्यामुळे सवाईमध्ये जुन्या-नव्या कलाकारांना ऐकण्याची पर्वणी मिळते. मी ठाण्यावरून दरवर्षी या महोत्सवाला हजेरी लावतो.  ज्येष्ठ  कलावंतांना ऐकायला मिळावे केवळ एवढीच त्यामागची इच्छा असते- नाना चरणकर
.................
महोत्सवातील आजचे कार्यक्रम ( दुपारी 3 ते रात्री 10)
कल्याण अपार, औरंगाबाद ( सनई)
रवींद्र परचुरे (गायन)
वसंत काब्रा ( सतार)
प्रसाद खापर्डे ( गायन) 
परवीन सुलताना (

Web Title: Challenge before new artists to save the glory of Sawaii

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.