दहावीच्या निकालाची टक्केवारी टिकवण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 11:25 AM2018-11-30T11:25:40+5:302018-11-30T11:28:57+5:30
फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिकेच्या आधारे घेतली जाणार आहे
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिकेच्या आधारे घेतली जाणार आहे.त्यामुळे शिक्षक ,विद्यार्थी व पालकांमध्ये यामुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, कोणतीही भीती न बाळता जिल्ह्यातील सर्व शाळांनी दहावीच्या निकालाची टक्केवारी कशी राखावी, यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कार्यशाळा घेवून मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व मुख्याध्यापक संघातर्फे दहावीची गुणवत्तावाढ,बदललेला अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेऐवजी दिली जाणारी कृतिपत्रिका याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत विभागीय शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड,डायेटच्या प्राचार्या कमलादेवी आवटे,बालभारतीचे पदाधिकारी सुजीत पाटोळे,शिवाजी तांबे यांनी मार्गदर्शन केले.
मीनाक्षी राऊत म्हणाल्या, इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून विद्यार्थ्यांच्या कल्पनेला वाव देण्याच्या दृष्टीने कृतिपत्रिका तयार करण्यात आला आहेत. त्यामुळे राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कृतिपत्रिकेनुसार घेतली जाणार आहे.परिणामी केवळ घोकमपट्टी करून विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाता येणार नाही.परंतु,शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे वातावरण घालवण्यासाठी आणि शाळांची निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पुढील काळात शिक्षकांचे उद्बोधन वर्ग घेतले जाणार आहेत. तसेच येत्या ४ डिसेंबरपासून जिल्ह्यातील सात केंद्रांवर सर्व विषयांच्या विषय शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली कृतिपत्रिकेबाबत कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुमारे ८०० मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पुढील काळात शिक्षकांचे उद्बोधन वर्ग घेतले जाणार आहेत. तसेच येत्या ४ डिसेंबरपासून जिल्ह्यातील सात केंद्रांवर सर्व विषयांच्या विषय शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली कृतिपत्रिकेबाबत कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुमारे ८०० मुख्याध्यापक उपस्थित होते.
...................