चिमुरड्याने दिले शासनाला आव्हान

By admin | Published: October 14, 2016 05:26 AM2016-10-14T05:26:06+5:302016-10-14T05:26:06+5:30

‘विमानतळ हाय हाय... विमानतळ हाय हाय...’च्या घोषणा देत राजेवाडीच्या आठ वर्षीय शेतकऱ्याच्या चिमुरड्याने ‘जमीन आमच्या मालकीची, नाही कुणाच्या बापाची... जर जबरदस्ती केली शासनाने तर

Challenges the government given by Chimudra | चिमुरड्याने दिले शासनाला आव्हान

चिमुरड्याने दिले शासनाला आव्हान

Next

पुणे : ‘विमानतळ हाय हाय... विमानतळ हाय हाय...’च्या घोषणा देत राजेवाडीच्या आठ वर्षीय शेतकऱ्याच्या चिमुरड्याने ‘जमीन आमच्या मालकीची, नाही कुणाच्या बापाची... जर जबरदस्ती केली शासनाने तर एकजुटीने लढू अहिंसेच्या मार्गाने’ अशी भावनिक साद आंदोलकांना घालत शासनाला इशारा दिला.
सध्या राज्यात मराठा क्रांती मूक मोर्चे सुरू असून, यात शेतकऱ्यांच्या मुलींनी मोर्चाचे नेतृत्व केले. भाषणेही फक्त त्यांचीच झाली. हाच कित्ता विमानतळविरोध मोर्चातही गुरुवारी दिसून आला. राजेवाडी गावातील विलास कडलक या शेतकऱ्याच्या ९ वर्षीय प्रथमेश कडलक या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे भाषण मोर्चाचे आकर्षण ठरले. प्रथमेशने शेतकऱ्यांच्या भावना आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.
तो म्हणाला, की पुरंदरच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र आमची वडिलोपार्जित जमीनच अधिग्रहित होणार आहे, त्याला आमचा विरोध आहे. आमचा विरोध हा राजकीय नाही तर प्रशासनाशी आहे. आम्ही अहिंसा व शांततेच्या मार्गाने हा लढा देणार आहोत. सात गावांनी ग्रामसभा घेऊन आपला विरोध असल्याचे मुख्यमंत्र्यांपासून एअरपोर्ट अथॉरिटीकडे कळविले आहे.
बुहुतांश शेतकरी हा अल्पभूधारक आहे. पिढ्यानपिढ्या तो यावर गुजराण करीत आहे. १९७२च्या दुष्काळाला आम्ही सामोरे गेलो. मात्र, आमच्या जमिनींचा बाजार केला नाही. त्यानंतर पुरंदर उपसा योजना आली. यामुळे शेतकरी फळशेतीकडे वळला. याची फळं कुठं हातात येऊ लागली, तर हे विमानतळाचं भूत आमच्या डोेक्यावर आणून ठेवलं असल्याचे प्रथमेशने सांगितले.

Web Title: Challenges the government given by Chimudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.