बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याचा मृत्यू
By admin | Published: May 2, 2016 02:25 AM2016-05-02T02:25:18+5:302016-05-02T04:58:49+5:30
पुणे जिल्ह्यात शिरूर येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षीय सुनील मोरे या चिमुरड्याला ३१ तासानंतर बाहेर काढण्यात रविवारी एनडीआरएफच्या जवानांना यश आले. मात्र, उपचारादरम्यान सुनीलने अखेरचा श्वास घेतला.
पुणे : पुणे जिल्ह्यात शिरूर येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या चार
वर्षीय सुनील मोरे या चिमुरड्याला ३१ तासानंतर बाहेर काढण्यात रविवारी एनडीआरएफच्या जवानांना यश आले. मात्र, उपचारादरम्यान सुनीलने अखेरचा श्वास घेतला.
शिरुरमधील मांडवगण फराटा भागातील जुना मळा येथे २५ फूट बोअरवेलमध्ये सुनील हरिदास मोरे हा ४ वर्षांचा मुलगा खेळता खेळता शनिवारी दुपारी बोअरवेलमध्ये पडला होता. तर रविवारी एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुनीलला बोअरवेलमधून बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाला.
जवळपास ३१ तासांपेक्षा जास्त सुनील या बोअरवेलमध्ये पडला असल्याने त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. भुकेमुळे आणि उष्णतेमुळे त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले होते. काळा पाषाण लागल्याने त्यातून सुनीलला कसलीही इजा न होता बाहेर काढणे आव्हान बनले होते. मात्र, तरीही एनडीआरएफच्या जवानांनी अत्यंत परिश्रमाने व कौशल्याने सुनीलला बाहेर काढले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली सुनीलची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. (प्रतिनिधी)