जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:27 AM2020-12-16T04:27:56+5:302020-12-16T04:27:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत आजपासून चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात झाली असून पुढील सहा दिवस हा उत्सव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत आजपासून चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात झाली असून पुढील सहा दिवस हा उत्सव जेजुरीत षडरात्रोत्सव साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा दिवसांचा हा उत्सव धार्मिक कार्यक्रमातच साधेपणाने साजरा केला जाणार आहे.
पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धरण करून चंपाषष्टीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी पर्यन्त ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसात खंडोबा गडावर विजयोस्त्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठी हा दिवस विजय दिन म्हणून ही साजरा केला जातो. उत्सवाचा प्रारंभ करताना आज पहाटेच मुख्य मंदीरात पाकाळणी करण्यात आली. मार्तंड भैरव मूर्तीला दही दूध व तेलाने स्नान घालण्यात आले. सभोवताली गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. महापूजा उरकल्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना मिरवणुकीने मंदीर प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रदक्षिनेंनंतर बालदारीत उत्सव मूर्तींना आणण्यात आले. मंगलमय वातावरणात तेथे उत्सवमूर्तीची स्थापना करून समोरच दिल्लीहून आलेले भीष्माचार्यजी महाराज यांच्या हस्ते घट बसवण्यात आले.
यावेळी देवांची महाआरती, भंडार खोबऱ्याची उधळण तसेच पुष्पवृष्टी ही करण्यात आली. देवाचे मानकरी, पुजारी सेवक वर्गाकडून उत्सवमूर्तींना सुवर्ण व चांदीचे दागीने घालण्यात आले. मार्तंड देवसंस्थान, जयमल्हार चंपाषष्टी प्रतीष्ठानच्यावतीने संपूर्ण गडकोटाला विध्युत रोषणाई करण्यात आली आहे. गाभाऱ्यात व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे. यावेळी मार्तंड देव संस्थान चे विश्वस्त राजकुमार लोढा, पंकज निकुडे, संदीप जगताप, शिवराज झगडे, जेजुरी पोलीस स्टेशनचे पी आय सुनील महाडिक उपस्थित होते.
उत्सवाचे नियोजन देवाचे पुजारी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, अनिल बारभाई, हनुमंत लांगी, चेतन सातभाई, प्रशांत सातभाई यांनी केले आहे
फोटो मेल केला आहे जेजुरीत मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.
फोटो :