एचपी रॉयल अकादमीला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:11 AM2021-02-09T04:11:57+5:302021-02-09T04:11:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : धीरज जाधव क्रिकेट अकादमी (डीजेसीए) आयोजित डीजेसीए महिला प्रीमियर लीग टी-१० क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या ...

Championship to HP Royal Academy | एचपी रॉयल अकादमीला विजेतेपद

एचपी रॉयल अकादमीला विजेतेपद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : धीरज जाधव क्रिकेट अकादमी (डीजेसीए) आयोजित डीजेसीए महिला प्रीमियर लीग टी-१० क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या हेमंत पाटील रॉयल क्रिकेट अकादमी संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात एचपी रॉयलने यजमान डीजेसीएवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर ही स्पर्धा झाली. सकाळच्या सत्रातील उपांत्य फेरीत एचपी रॉयलने बलाढ्य मध्य रेल्वेला चुरशीच्या लढतीत १३ धावांनी हरविले होते. त्यानंतर दुपारच्या सत्रातील अंतिम सामना त्यांनी एकतर्फी ठरविला. एचपी रॉयलने ४ बाद १६४ अशी भक्कम धावसंख्या उभारली. डीजेसीएला ८ बाद १०३ धावांपर्यंतच मजल मारता आली. तेजल हसबनीस सामन्यात सर्वोत्तम ठरली.

एचपी रॉयलची कर्णधार पूनम खेमनार हिने नाणेपेक जिंकून फलंदाजी घेतली. सलामीची फलंदाज मुक्ता मगरे हिने दुसऱ्या विकेटसाठी सायली लोणकर हिच्या साथीत १०७ धावांची शतकी भागिदारी रचली. या जोडीने डीजेसीएच्या गोलंदाजांना दाद लागू दिली नाही. मुक्ताला ७३ धावांवर डीजेसीएची गोलंदाज प्रिया कोकरे हिने ‘मंकड’ प्रकाराने धावबाद केले. एकोणीसाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर हे घडले, मात्र त्याचा अखेरीस निकालावर परिणाम झाला नाही.

या आव्हानासमोर डीजेसीएला शतकी टप्पा कसाबसा पार करता आला. यष्टिरक्षिका जाई देवण्णावार हिने अर्धशतकासह झुंज दिली, पण अनुजा पाटील हिचा अपवाद वगळता तिला कुणाकडूनही साथ मिळू शकली नाही. डीजेसीएच्या या दोघीच किमान दोन अंकी धावा करू शकल्या. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागिदारी रचली. तेजल हसबनीस हिने अनुजाला स्वतःच्याच चेंडूवर झेलबाद केले. त्यानंतर जाईला सोनल पाटीलच्या चेंडूवर वैष्णवी शिंदेने यष्टिचीत केले. सोनलने १४ धावांत निम्मा संघ गारद केला.

Web Title: Championship to HP Royal Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.