व्हेरॉक अकादमीला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:51+5:302021-03-26T04:11:51+5:30
पुणे : विकी ओस्तवालच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक अकादमी संघाने केडन्स अकादमीवर आठ गडी राखून मात करत १९ वर्षांखालील ...
पुणे : विकी ओस्तवालच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक अकादमी संघाने केडन्स अकादमीवर आठ गडी राखून मात करत १९ वर्षांखालील केडन्स चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना केडन्स संघाचा डाव ३७ षटकांत १३६ धावांवर संपुष्टात आला. व्हेरॉकने २८.३ षटकांत दोन बाद १३७ धावा करताना विजय मिळवला. केडन्सकडून प्रद्युम्न चव्हाण (२८), दिग्विजय पाटील (२४) यांनी झुंज दिली. व्हेरॉककडून विकी ओस्तवालने चार तर ओंकार राजपूत आणि सोहम वामले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्हेरॉककडून सूरज गोंड (नाबाद ५८), विकी ओस्तवाल (नाबाद ४२) यांनी संघाचा विजय साकारला. केडन्सकडून आर्शिन कुलकर्णी आणि शुभम खरात यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विकी ओस्तवाल सामनावीर ठरला.
शिवम ठोंबरे (पीवायसी, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक), आर्यन गोजे (केडन्स, सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक), ओंकार राजपूत (व्हेरॉक, सर्वोत्कृष्ट गोलंदाज), सूरज गोंड (व्हेरॉक, सर्वोत्कृष्ट फलंदाज), प्रद्युम्न चव्हाण (केडन्स, मालिकावीर) यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, सचिव रियाज बागवान, सत्येन लांडे, भगवान काकड, समद फल्ला, हर्षद खडीवाले उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : केडन्स अकादमी - ३७ षटकांत सर्वबाद १३६ धावा. प्रद्युम्न चव्हाण (२८), दिग्विजय पाटील (२४), आर्यन गोजे (नाबाद १७). गोलंदाजी - विकी ओस्तवाल ४-२७, ओंकार राजपूत २-२९, सोहम वामले (२-१८).
व्हेरॉक अकादमी - २८.३ षटकांत दोन बाद १३७. सूरज गोंड (नाबाद ५८), विकी ओस्तवाल (नाबाद ४२), यश वागदले (२०). गोलंदाजी - शुभम खरात १-२२, आर्शिन कुलकर्णी १-३३.