हाय अलर्ट! पुण्यासह सात जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 04:37 PM2021-08-16T16:37:55+5:302021-08-16T17:08:15+5:30

मागच्या तीन-चार दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत

Chance of heavy rains in seven districts including Pune; Hi alert issued | हाय अलर्ट! पुण्यासह सात जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

हाय अलर्ट! पुण्यासह सात जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देकाही ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळणार

पुणे : राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालंय. मागच्या तीन-चार दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आज कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. हीच स्थिती पुढील तीन दिवस राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेकडून देण्यात आलीये. 

आज कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी येलो अर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे. 

सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती  निर्माण झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकतो. 

पुण्यासह सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल.

Web Title: Chance of heavy rains in seven districts including Pune; Hi alert issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.