पुण्यात आज रात्री उशिरा पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 07:35 PM2019-10-10T19:35:41+5:302019-10-10T19:39:20+5:30
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाप्रमाणे शहराला आजही पावसाने झोडपण्याची शक्यता मुंबई हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र कालप्रमाणे संध्याकाळी नाही तर रात्री उशिरा हा पाऊस पडणार असल्याचे त्यात म्हटले आहे.
पुणे : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाप्रमाणे शहराला आजही पावसाने झोडपण्याची शक्यता मुंबई हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र कालप्रमाणे संध्याकाळी नाही तर रात्री उशिरा हा पाऊस पडणार असल्याचे त्यात म्हटले आहे.
बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने पुणे शहराला झोडपून काढले होते. अवघ्या ४० मिनिटांच्या पावसात संपूर्ण शहरात झाडपडीच्या घटना आणि पाणी तुंबण्याची उदाहरणे बघायला मिळाली. हा परतीचा पाऊस आहे असेही हवामान खात्याने जाहीर केले आहे. अखेर आजही पाऊस येणार असून पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सलग ५ दिवस पाऊस नसणे, हवेतील आद्रता कमी होत जाणे, हवेचे अँटी चक्रवात अभिसरण अशा काही निकष पूर्ण केल्यानंतर मॉन्सूनने माघारीचा प्रवास सुरु केला असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर केले जाते़ त्यानुसार आज मॉन्सूनने हे सर्व निकष पूर्ण केल्याने हवामान विभागाने मॉन्सूने परतीचा प्रवास सुरु केल्याचे जाहीर केले आहे़.
या पावसात गाडी वेगाने चालवणे धोकादायक आहे. कारण अशा पावसात दृश्यमानता कमी झालेली असते. त्यात झाडांच्या भोवती माती ओली असल्याने झाडे पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे गाड्याही झाडांखाली पार्क करणे टाळावे.