अपघातात जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते; पुण्यात साजरा होणार ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 06:31 PM2023-05-19T18:31:57+5:302023-05-19T18:32:33+5:30

न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतात कुठेही दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक

Chances of surviving an accident increase by 80 percent Symbolic Helmet Day to be celebrated in Pune | अपघातात जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते; पुण्यात साजरा होणार ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’

अपघातात जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते; पुण्यात साजरा होणार ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’

googlenewsNext

पुणे: हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्ह्यात २४ मे रोजी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी हे नियमितपणे हेल्मेटचा वापर करत असले तरी त्यांनी हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी, जनतेस मार्गदर्शक ठरावे आणि स्वतःच्या व सहप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २४ मे रोजी हेल्मेट परिधान करून ‘लाक्षणीक हेल्मेट दिवस’ साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

भारतात दररोज सुमारे ४११ भारतीयांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. वाहन अपघातात दगावणाच्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते. मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर १५ ते २१ मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषयासंदर्भात '७ यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक २०२३' चे आयोजन करण्यात आले आहे. रस्ते अपघातांप्रती स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे. केवळ जागरूकता वाढवणे हाच नव्हे तर रस्ते अपघातातील जखमींना वेळेत व योग्य उपचार व मदत मिळवून देणे हेही यात अंतर्भूत आहे.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात येताना जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे.

Web Title: Chances of surviving an accident increase by 80 percent Symbolic Helmet Day to be celebrated in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.