चंपा' म्हणून डिवचणाऱ्या विरोधकांची चंद्रकांत पाटलांकडून फिरकी !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 07:34 PM2019-10-17T19:34:26+5:302019-10-17T19:37:32+5:30
राज ठाकरे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, परंतु आज शरद पवार जे म्हणतील ते राज करतात. अजित पवार यांनी मला चंपा म्हटल तर राज यांनी दुसरं काहीतरी म्हणावं. अजित पवार जे म्हणाले, ते म्हणण्याइतकी प्रगल्भता त्यांनी कमी करून घेऊ नये.
पुणे : राज ठाकरे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, परंतु आज शरद पवार जे म्हणतील ते राज करतात. अजित पवार यांनी मला चंपा म्हटल तर राज यांनी दुसरं काहीतरी म्हणावं. अजित पवार जे म्हणाले, ते म्हणण्याइतकी प्रगल्भता त्यांनी कमी करून घेऊ नये. आम्ही बोललो तर महागात पडेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होती. यावेळी व्यासपीठावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, आठही महादारसंघांचे उमेदवार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.
अनेकजण म्हणाले मी बाहेरचा आहे मी काय पाकिस्तानचा आहे का असा सवालही त्यांनी यावेळी केला. 12 वर्ष मी पुणे जिल्ह्याच्या पदवीधर चा उमेदवार होतो.आई प्रेमाने चंदा म्हणते. माझ्यावर यांचं जास्त प्रेम आहे असं समजतो म्हणून ते मला चंपा म्हणतात असावेत असेही पाटील यावेळी म्हणाले.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पाटील निवडणूक लढवत आहेत. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पाटील मूळचे कोल्हापूरचे असल्याने ते बाहेरचे असल्याचे टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पाटील यांना चंपा असे संबोधले होते. तसेच राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत चंपा असा उल्लेख केला होता. त्यावर आज पाटील यांनी प्रतिउत्तर दिले.