'कार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं ही संस्कृती शरद पवारांनीच रुजवली की...', चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:14 PM2022-05-17T16:14:37+5:302022-05-17T16:15:55+5:30
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता
पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल झाला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगेलच तापल्याचे दिसू लागले आहे. राष्ट्रवादी, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर हल्लाबोल केला जात आहे. तर भाजपच्या नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी सुद्धा पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय असल्याचे ट्विट केले आहे.
गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे.@smritiirani
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 17, 2022
''गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी असे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.''
''चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहेत. यावर चंद्रकांत पाटलांनी रोहित पवार यांना उत्तर देत सवाल उपस्थित केला आहे.''
रोहित पवारांना चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवारांनी ही संस्कृती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच 'हात' आहे. असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या @PawarSpeaks यांनीच ही संस्कृती NCP कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच 'हात' आहे? https://t.co/sHVpYezUDh
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 17, 2022