किशोर आवारे हत्येप्रकरणी आरोपींना कडक शासन करणार- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 01:19 PM2023-05-17T13:19:11+5:302023-05-17T13:20:41+5:30

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मयत किशोर आवारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले...

Chandrakant Patil said In the case of Kishore Aware murder, the accused will be severely punished | किशोर आवारे हत्येप्रकरणी आरोपींना कडक शासन करणार- चंद्रकांत पाटील

किशोर आवारे हत्येप्रकरणी आरोपींना कडक शासन करणार- चंद्रकांत पाटील

googlenewsNext

तळेगाव दाभाडे (पुणे) : किशोर आवारे हा चांगला कार्यकर्ता होता. दीनदुबळ्या आणि सर्वसामान्यांची कामे करीत होता. त्यांची झालेली हत्या ही निंदनीय आहे. या हत्या प्रकरणातून कोणीही सुटणार नाही. जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शासन झालेच पाहिजे. त्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. मंगळवारी (दि. १६) तळेगाव दाभाडे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मयत किशोर आवारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

सांत्वन करताना चंद्रकांत पाटील भावुक झाले होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, चंद्रकांत शेटे, किरण राक्षे आदी उपस्थित होते. यावेळी किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना आवारे, पत्नी विद्या आवारे, भाऊ रवींद्र आवारे, मुलगी प्रियंका आवारे, मामा बाळासाहेब काकडे, रामदास काकडे, गणेश काकडे यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.

किशोर आवारे यांच्या नातेवाइकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. चंद्रकांत पाटील आवारे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर उपस्थित महिलांनी किशोर भाऊ यांना न्याय देण्याची मागणी केली. किशोरभाऊ गरिबांचे कैवारी होते. आमचे ते दैवत होते. आमच्या भाऊंना न्याय द्या, अशी मागणी स्त्रीशक्ती भाजी मार्केटच्या अध्यक्ष संगीता डुबे यांनी केली.

Web Title: Chandrakant Patil said In the case of Kishore Aware murder, the accused will be severely punished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.