"घरी जा स्वयंपाक करा", ची राज्य महिला आयोगाकडून दखल; पाटलांकडे खुलाशाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:56 PM2022-05-27T18:56:29+5:302022-05-27T19:07:49+5:30

राज्य महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत अनेकांनी तक्रारी

chandrakant patil statement noted the State Women Commission Demand for disclosure from chandrakant Patil | "घरी जा स्वयंपाक करा", ची राज्य महिला आयोगाकडून दखल; पाटलांकडे खुलाशाची मागणी

"घरी जा स्वयंपाक करा", ची राज्य महिला आयोगाकडून दखल; पाटलांकडे खुलाशाची मागणी

Next

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना केलेले तुम्ही घरी जा स्वयंपाक करा हे वक्तव्य भलतेच महागात पडणार असल्याचे दिसते आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात थेट पाटील यांनाच या वक्तव्याचा खुलासा करा असे पत्र पाठवले आहे.

आयोगाकडे पाटील यांच्या वक्तव्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यात हा महिलांचा अवमान आहे इथपासून ते महिलांच्या बाबतीत असा विचार केला जात असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करणारी पत्रेही आहेत. पुणे शहर लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. असीम सरोदे यांच्या याच आशच्याच्या पत्राचाही त्यात समावेश आहे.

त्यामुळेच आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी थेट पाटील यांनाच एक पत्र दिले आहे. त्यात त्यांनी तुमचे हे वक्तव्य समस्त महिला वर्गाच्या आत्मसन्माला ठेच पोहचवणारे आहे असे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३, कलम१२ (२), व १२ (३) नुसार या वक्तव्याचा येत्या दोन दिवसात आयोगाकडे लेखी खुलासा सादर करावा असे आयोगाच्या पत्रात चाकणकर यांनी नमुद केले आहे.

Web Title: chandrakant patil statement noted the State Women Commission Demand for disclosure from chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.