ॲमेनिटी स्पेसच्या विक्रीला चंद्रकांत पाटलांची संमतीच : प्रशांत जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:27+5:302021-09-10T04:17:27+5:30

पुणे : भाजपने महापालिकेच्या मालकीच्या १८५ ॲमेनिटी स्पेस विक्रीला काढल्या असून, त्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ७४ ॲमेनिटी स्पेसचा समावेश ...

Chandrakant Patil's consent for sale of amenity space: Prashant Jagtap | ॲमेनिटी स्पेसच्या विक्रीला चंद्रकांत पाटलांची संमतीच : प्रशांत जगताप

ॲमेनिटी स्पेसच्या विक्रीला चंद्रकांत पाटलांची संमतीच : प्रशांत जगताप

googlenewsNext

पुणे : भाजपने महापालिकेच्या मालकीच्या १८५ ॲमेनिटी स्पेस विक्रीला काढल्या असून, त्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ७४ ॲमेनिटी स्पेसचा समावेश आहे. कोथरूडचे आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोल्हापुरातून पुण्यात येऊन कोथरूडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटील यांना कोथरूडकरांनी स्वीकारले. त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. परंतु, त्यांचा कोथरूडकरांना काही फायदा होणे तर दूरच, उलट त्यांना निवडून देणे त्रासदायक ठरत आहे, हे ॲमेनिटी स्पेस विक्री प्रकरणातून दिसून येत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

भाजपने विक्रीस काढलेल्या १८५ पैकी ७४ ॲमेनिटी स्पेस या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कोथरूड, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील आहेत. या ॲमेनिटी स्पेसची विक्री झाल्यानंतर कोथरूडकरांना आरक्षणाच्या जागाच शिल्लक राहणार नाहीत.

कोथरूड मतदारसंघातील बहुसंख्य नगरसेवकांनी आणि शहरातील भाजपच्या आणखी काही अशा जवळपास ३० नगरसेवकांनी नुकतीच गुप्त बैठक घेतली. त्यात असंतोषाचा भडका उडाला. त्यानंतर महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बंडाची कल्पना आल्यानंतर मंगळवारची महानगरपालिकेची मुख्य सभा तहकूब केली. यातून चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, हे लक्षात येत असल्याचे जगताप म्हणाले.

---------

Web Title: Chandrakant Patil's consent for sale of amenity space: Prashant Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.